ETV Bharat / state

Minor Girl Gang Rape : मित्रानंच केला घात; चिमुरडीवर आळीपाळीनं सामूहिक बलात्कार, चार जणांना अटक - Minor Girl Gang Rape thane

Minor Girl Gang Rape : ठाणे जिल्ह्यात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सात नराधमांनी आळीपाळीनं सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील एका गावाच्या हद्दीत असलेल्या पडीक खोलीत घडली.

Gang Rape
Gang Rape
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 17, 2023, 5:46 PM IST

Updated : Oct 17, 2023, 6:32 PM IST

ठाणे : Minor Girl Gang Rape : एका 16 वर्षीय अल्पवयीन चिमुरडीवर सात नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आलीय. या सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळं भिवंडी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील (Thane Rape News) एका गावाच्या हद्दीत असलेल्या एका पडीक खोलीत घडली. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात सामूहिक अत्याचाराचा (Bhiwandi Rape News) गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आतापर्यत चार नराधमांना अटक केली आहे, तर तीन नराधम अद्यापही फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत असून, आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणवीर बायेस यांनी दिली आहे.

मित्रानेच केला बलात्कार : मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील एका गावाच्या हद्दीत पीडित अल्पवयीन मुलगी कुटूंबासह राहत आहे. 2 ऑक्टोबर रोजी पीडित मुलीच्या एका मित्रानं तिला गावाच्याच हद्दीत असलेल्या एका पडीक घरात भेटण्यासाठी बोलावलं होतं. पीडित त्या मित्रावर विश्वास ठेवून पडीक खोलीत मित्राला भेटायला गेली होती. तेव्हा तिच्या मित्रानं तिच्यावर बलात्कार केला. शिवाय घडलेल्या प्रकाराबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही पीडितेला दिली.

पीडितेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, अन्य तीन फरार आरोपींना शोधण्याचे काम सुरू आहे. लवकरच फरार आरोपींनाही अटक केली जाईल - वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणवीर बायेस

आळीपाळीनं सामूहिक बलात्कार : खळबळजनक बाब म्हणजे, घटनेच्या दिवशीच काही वेळाने त्या नराधम मित्रानं त्याच्या आणखी सहा मित्रांना त्या पडीक खोलीत बोलावून घेतलं. त्यानंतर या सातही नराधमांनी पीडितेवर आळीपाळीनं सामुहिक बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे, नराधमानं पीडितेवर अत्याचार करतानाचे व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात चित्रीकरण करून, सोशल मीडियावर व्हायरल केला होता. मात्र, त्यानंतर व्हिडिओ डिलीट केला. तोपर्यत हा व्हिडिओ परिसरात राहणाऱ्या नागरिकांपर्यत पोहचला होता. त्यामुळं या सामूहिक बलात्काराच्या घटनेला वाचा फुटली होती.

चार जणांना अटक, तीन फरार : 15 ऑक्टोंबर रोजी (रविवारी) रात्रीच्या सुमारास पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्कारासह पोक्सो कायद्यानुसार सातही नराधमांवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तालुका पोलिसांनी 16 ऑक्टोंबर रोजी या गुन्ह्यातील चार नराधमांना अटक केली आहे, तर तीन नराधमांचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणवीर बायेस यांनी दिलीय. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं ही घटना पोलिसांपर्यंत पोहचल्याची माहितीही त्यांनी दिली. 17 ऑक्टोंबर रोजी अटक चार नराधमांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयानं 23 ऑक्टोंबरपर्यत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणवीर बायेस यांनी दिली. तसेच लवकरच फरार तीन आरोपींना अटक करू, असेही बायेस म्हणाले.

हेही वाचा -

  1. Baramati Crime News : महिलेवर बलात्कार करत उकळले पैसे; पीडितेच्या पतीलाही ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीविरोधात गुन्हा
  2. Bombay High court News : बलात्कार पीडितेच्या 29 आठवड्यांच्या गर्भपाताला मंजुरी, मुंबई हायकोर्टाचा निर्णय
  3. Delhi Crime News : यूट्यूबर झालेला स्वयंघोषीत बाबा करत होता महिलांवर बलात्कार, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

Last Updated : Oct 17, 2023, 6:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.