ETV Bharat / state

'...तब मेरा बाप फाँसी के तक्त को चुम के, इनक्लाब झिंदाबाद के नारे लगा रहा था'

संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने CAA कायदा, NRC व NPR विरोधात जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी, महाराष्ट्रात एनआरसी लागू होऊ देणार नसल्याचा शब्द दिला.

मंत्री जितेंद्र आव्हाड
मंत्री जितेंद्र आव्हाड
author img

By

Published : Jan 18, 2020, 10:27 PM IST

Updated : Jan 21, 2020, 10:23 AM IST

ठाणे - महाराष्ट्रात एनआरसी लागू होऊ देणार नाही, हा माझा शब्द असल्याचे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भिवंडीत केले. ते संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी व राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी कायद्या विरोधात आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी एका कवितेने आपल्या भाषणाला सुरूवात केली.

  • #WATCH Jitendra Awhad,NCP in Thane:Main Delhi ke takht se poochta hoon,ab tu maangega mujhse saboot mere deshvasi hone ka?Toh sun,jab tera baap sar jhukakar angrezon ke talwe chaat raha tha,tab mera baap phansi ke takht ko choomke inquilab zindabad ke naare laga raha tha.(18.01) pic.twitter.com/WOwKP167xQ

    — ANI (@ANI) January 20, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'...तब मेरा बाप फाँसी के तक्त को चुम के, इनक्लाब झिंदाबाद के नारे लगा रहा था'

'सून ले सून ले सून ले, किस की जमीन है ये, दफन जिसके पुरखे उसकी जमीन है ये, अब तू मांगेगे सबुत मेरे देशवासी होनेका, तेरा बाप जब अंग्रेजोंके तलवे चाट रहा था, तब मेरा बाप फाँसी के तक्त को चुम के, इनक्लाब झिंदाबाद के नारे लगा रहा था, उसकी जमीन है ये', या कवितेने आव्हाड यांनी आपल्या भाषणाला सुरवात केली.

हेही वाचा... बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून... प्रवेश पत्रिका 'ऑनलाईन' उपलब्ध

आव्हाड यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारवर घणाघाती हल्ला चढवीत या देशातील असंख्य हिंदू जातीतील नागरीक आपल्या वडिलांचे अंत्यसंस्कार कोठे केले ते सांगू शकत नाही. परंतु मुस्लिम आपल्या पूर्वजांच्या कबरी दाखवू शकतात असे सांगत, महाराष्ट्रातील पारधी, कोल्हाटी समाज आज ही आपले पुरावे दाखवू शकणार नाहीत. मोदी सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली असून केरळ, पंजाब प्रमाणेच महाराष्ट्रामध्ये या कायद्याची अंमलबजावणी केली जाणार नाही, असा शब्द दिला.

भिवंडीत संविधान बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून कै. परशुराम तावरे क्रीडांगण या ठिकाणी मोहम्मद शब्बीर अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जाहीर सभेत व्यासपीठावर डॉ जितेंद्र आव्हाड, योगेंद्र यादव, माजी न्यायमूर्ती बी. जे. कोळसे पाटील, उमर खालिद, माजी आय.पी.एस. अधिकारी अब्दुल रेहमान, सलामत साबरी, डॉ. मोहम्मद कामरान, मुस्तफा फारूक यांसह विद्यार्थिनींची प्रतिनिधी म्हणून निदा सलाम शेख या मुलीस आपले विचार व्यक्त करण्याची संधी दिली.

देशातील बहुजन भूमिपूत्र समाजाला आर्य भटांनी हजारो वर्षे नागवे केले आहे. ब्राह्मणवादी विचारांविरोधातील ही लढाई आहे. एनआरसी, सीएए हे मुस्लिम विरोधात नसून मुस्लिम फक्त बहाणा आहे. देशातील एससी, एसटी, ओबीसी हा त्यांचा निशाणा आहे. ही लढाई सर्व एकत्र येऊन लढलो तर आपण नक्कीच जिंकू त्यासाठी फक्त सभांना गर्दी करून शक्य होणार नाही. त्यासाठी सर्वांनी गावागावात, मोहल्ल्यात त्या विरोधात प्रचार केला पाहिजे, असे म्हणत मोदी शहांवर बी. जे. कोळसे पाटील यांनी टीका केली .

विद्यार्थी नेता उमर खालिद यांनी आपल्या भाषणात मोदींवर सडकून टीका केली. मोदी विकास पुरुष असल्याचा मुखवटा घालून फिरतात. आता त्यांनी ते मुस्लिम महिलांना भाऊ असल्याचा मुखवटा घालून फिरत आहेत. भारत मोदींचा नाही तर बाबासाहेब आंबेडकरांचा देश आहे. आम्ही आमच्या मेहनतीचे खातो अंबानीच्या तुकड्यावर नाही जगत भिवंडी शहरातील पॉवर लूममधील धागा हिंदू-मुस्लिम समाजाला एकत्र जोडणारा आहे, असे शेवटी सांगितले.

हेही वाचा - भिवंडीत अन्न निरिक्षकाच्या कारवाईत 2 कोटी 75 लाखांचा गुटखा जप्त

तर योगेंद्र यादव यांनी आपल्या भाषणाची सुरवात भिवंडी शहरातील यंत्रमाग व्यवसायाची आठवण करून देत ताना व बाना असला तर चांगला कापड बनतो. त्यामुळे कापड ओळखणारे भिवंडी शहर असल्याने ते मोदींचा रंग नक्कीच ओळखतील असे सांगितले. ते पुढे म्हणाले, मोदींना सफेद टोपी व हिजाफ दिसते परंतु या लाखोंच्या हातातील तिरंगा दिसत नाही हे दुर्दैव आहे. या आंदोलनातून देशातील घुसमट बाहेर आली असून, खरे चित्र महिलांच्या रूपाने समोर आले आहे, शाहीनबाग येथील आंदोलनाने हे दाखवून दिले महिलांची ताकद काय आहे. पुढच्या पिढीला उत्तर देण्यासाठी आपण या आंदोलनात असून प्रत्येक भारतीयाने त्याच भावनेतून यायला पाहिजे, असे शेवटी आवाहन केले.

हेही वाचा - बँकेत नोकरी, म्हाडाच्या घराचे आमिष दाखवून ९ जणांना लाखोंचा गंडा, आरोपीला अटक

संपूर्ण क्रीडांगणामध्ये मोठी गर्दी दिसून आली. पोलिसांनी क्रीडांगणचे प्रवेशद्वार बंद केले. त्यानंतर हजारो नागरिकांनी बाहेरील एलसीडीवर हा कार्यक्रम बघताना समाधान मानले. या सभेला एक ते दीड लाख नागरिक उपस्थित होते. तर हजारोंच्या संख्येने महिलाही उपस्थित होत्या.

हेही वाचा - ठाणे : भिवंडी तालुक्यात 40 दुचाक्या घसरुन 25 जण जखमी, 'हे' आहे कारण

Intro:kit 319Body:महाराष्ट्रात एनआरसी लागू होऊ देणार नाही ... डॉ जितेंद्र आव्हाड

ठाणे : महाराष्ट्रात एनआरसी लागू होऊ देणार नाही हा माझा शब्द असल्याचे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भिवंडीत केले. ते संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी व राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी कायद्या विरोधात आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलत होते.

आव्हाड यांनी सून ले सून ले सून ले ,किस की जमीन है यह , दफन जिसके पुरखे उसकी जमीन है यह, अब तू मांगेग सबुत मेरे देशवासी होनेका , तेरा बाप जब अंग्रेजोंके तलवे चाट रहा था ,तब मेरा बाप फासीके फंदे को चुम रहा था उसकी जमीन है यह, या कवितेने त्यांनी आपल्या भाषणाला सुरवात केली. त्यांनतर आव्हाड यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारवर घणाघाती हल्ला चढवीत या देशातील असंख्य हिंदू जातीतील नागरीक आपल्या वाडवडिलांचे अंत्यसंस्कार कोठे केले ते सांगू शकत नाही. परंतु मुस्लिम आपल्या पूर्वजांच्या कब्र दाखवू शकतात असे सांगत ,महाराष्ट्रातील पारधी, कोल्हाटी समाज आज ही आपले पुरावे दाखवू शकणार नाही. असे सांगत मोदी सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली असून केरळ पंजाब प्रमाणेच महाराष्ट्रा मध्ये या कायद्याची अंमलबजावणी केली जाणार नाही असा शब्द दिला .
भिवंडीत संविधान बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून कै परशराम तावरे क्रीडांगण या ठिकाणी मोहम्मद शब्बीर अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जाहीर सभेत व्यासपीठावर डॉ जितेंद्र आव्हाड ,योगेंद्र यादव , माजी न्यायमूर्ती बी जे कोळसे पाटील , उमर खालिद ,माजी आय पी एस अधिकारी अब्दुल रेहमान ,सलामत साबरी ,डॉ मोहम्मद कामरान ,मुस्तफा फारूक यांसह विद्यार्थिनींची प्रतिनिधी म्हणून निधा सलाम शेख या मुलीस आपले विचार व्यक्त करण्याची संधी दिली. संविधान बचाव संघर्ष समितीचे निमंत्रक अँड किरण चन्ने ,विजय कांबळे ,फाजील अन्सारी उपस्थित होते. प्रारंभी अँड किरण चन्ने यांनी सर्व मान्यवरांचे संविधानाची प्रत देऊन सन्मान केला .
देशातील बहुजन भूमिपुत्र समाजाला आर्य भटांनी हजारो वर्षे नागवे केले आहे .ब्राह्मणवादी विचारां विरोधातील ही लढाई आहे .एनआरसी, सीएए हे मुस्लिम विरोधात नसून मुस्लिम फक्त बहाणा आहे. देशातील एससी, एसटी, ओबीसी हा त्यांचा निशाणा आहे. ही लढाई सर्व एकत्र येऊन लढलो तर आपण नक्कीच जिंकू त्यासाठी फक्त सभांना गर्दी करून शक्य होणार नसून ,त्यासाठी सर्वांनी गावागावात, मोहल्ला मोहल्ल्यात त्या विरोधात प्रचार केला पाहिजे .तिन्ही लष्कराचा प्रमुख रावत झाले ते संघाचे असून त्या माध्यमातून मोदी देशात हुकूमशाही आणू इच्छितो ,या निमित्त मोदी शहा यांच्यावर बी जे कोळसे पाटील यांनी टीका केली .
तर विद्यार्थी नेता उमर खालिद यांनी आपल्या भाषणात मोदींवर सडकून टिका केली .मोदी विकास पुरुष असल्याचा मुखवटा घालून फिरतात . आता त्यांनी ते मुस्लिम महिलांना भाऊ असल्याचा मुखवटा घालुन फिरत आहेत. भारत मोदींचा नाही तर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. आम्ही आमच्या मेहनतीचं खातो अंबानीच्या तुकड्यावर नाही जगत भिवंडी शहरातील पॉवर लूम मधील धागा हिंदू मुस्लिम समाजाला एकत्र जोडणारा आहे असे शेवटी सांगितले.
तर योगेंद्र यादव यांनी आपल्या भाषणाची सुरवात भिवंडी शहरातील यंत्रमाग व्यवसायाची आठवण करून देत ताना व बाना असला तर चांगला कपडा बनतो ,त्यामुळे कपडा ओळखणारे भिवंडी शहर असल्याने ते मोदींचा रंग नक्कीच ओळखतील असे सांगत आपल्या भाषणात मोदींना सफेद टोपी व हिजाफ दिसते परंतु या लाखोंच्या हातातील तिरंगा दिसत नाही हे दुर्दैव आहे .या आंदोलनातून देशातील घुसमट बाहेर आली असून ,खरे चित्र महिलांच्या रूपाने समोर आले ,शाहीनबाग येथील आंदोलनाने हे दाखवून दिले महिलांची ताकद काय आहे . पुढच्या पिढीला उत्तर देण्यासाठी आपण या आंदोलनात असून प्रत्येक भारतीयाने त्याच भावनेतून यायला पाहिजे असे शेवटी आवाहन केले .
या सभेसाठी दुपारी तीन वाजता शहराच्या विविध भागातून क्रीडांगणाकडे नागरिकांचे जथेच्या जत्थे हातात तिरंगा घेऊन दाखल होण्यास सुरवात झाली व पाहता पाहता संपूर्ण क्रीडांगण माणसांनी फुलून गेल्याने पोलिसांनी क्रीडांगणचे प्रवेशद्वार बंद केले. त्यानंतर हजारो नागरिकांनी बाहेरील एलसीडी वर हा कार्यक्रम बघताना समाधान मानले. या सभेला एक ते दीड लाख नागरिक उपस्थित होते. तर हजारोंच्या संख्येने महिलाही उपस्थित होत्या.

Conclusion:nrc
Last Updated : Jan 21, 2020, 10:23 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.