ETV Bharat / state

बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कन्हैय्या आणि आव्हाडांची गुप्त बैठक, माध्यमांशी बोलणे टाळले

author img

By

Published : Oct 16, 2020, 3:15 PM IST

या बैठकीत बिहार निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याचे कळत असून बिहार निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते. एरवी प्रसार माध्यमांशी स्वत:हून बोलणारे मंत्री जितेंद्र आव्हाड आणि कन्हैय्या कुमार यांनी भेटीनंतर प्रसार माध्यमांशी मात्र बोलणे टाळले.

ठाणे
ठाणे

ठाणे - बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ठाण्यात कन्हैय्या कुमारने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या दालनात जवळपास २०-२५ मिनिटे आव्हाड आणि कन्हैय्या कुमार यांच्यात गुप्त बैठक चालली.

बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कन्हैय्या आणि आव्हाडांची गुप्त बैठक

लोकसभा निवडणुकीच्या वेळी जितेंद्र आव्हाड बिहारला प्रचारासाठी गेले होते. त्यानंतर कन्हैय्या कुमारदेखील विधानसभा निवडणुकीत आव्हाड यांच्या प्रचाराला आला होता. अशा पद्धतीने आव्हाड आणि कन्हैय्या कुमार यांच्या एकमेकांना मदतीची जुनी पार्श्वभूमी आहे. त्यामुळे आता बिहार निवडणुकीसाठी आव्हाड प्रचाराला जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा - अंध बांधवांचा अंबरनाथ तहसील कार्यलयावर धडक मोर्चा, रोजगारासह निवाऱ्याची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.