ठाणे - भाजपा जनआशीर्वाद यात्रा काढते, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टीसह शिवसेना पक्षाकडून रॅली काढण्यात येते, सभा घेण्यात येते. तेव्हा त्यांच्या सभेला गर्दी झालेली चालते, त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत. एमआयएमला रॅली काढण्याचा अधिकार का नाही, असा प्रश्न उपस्थित करत आम्हीही रॅली काढणार, असे वक्तव्य एमआयएम पक्षाचे माजी आमदार वारिस पठाण यांनी केले आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच सर्वच राजकीय पक्षांना रॅली व सभा मेळावे घेण्यास बंदी घातली आहे.
राष्ट्रवादी, समाजवादी, एमआयएमवर कोरोना नियमाचे गुन्हे नाही
जन आशीर्वाद यात्रेच्या आयोजकांनावर भिवंडी शहरातील सात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. मात्र, गेल्याच शुक्रवारी राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांची रॅली व भिवंडी महापालिका मुख्यालयातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी करून कोरोना नियमाचे उल्लंघन केले. त्यापाठोपाठ समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांची शनिवारी जोरदार शक्ती प्रदर्शन करून शहरात रॅली काढली होती. दोन्ही रॅलीमध्ये हजारोंच्या संख्यने कार्यकर्त्यांचा जमाव होता. तर मुख्यमंत्र्याच्या आव्हानानंतरही बुधवारी (दि. 8 सप्टेंबर) सायंकाळी भिवंडीत एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांच्या रॅली व सभेत कार्यकर्त्यांची तोबा गर्दी झाली होती.
महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांची भिवंडीत धाव
भिवंडी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका एप्रिल, 2022 मध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वच राजकीय पक्षांनी भिवंडी शहरात कार्यकर्ता सभांच्या माध्यमातून मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. प्रत्येक राजकीय पक्षांचे नेते शहरात येताना राजनोली नाका येथून भव्य बाईक रॅलीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करत आहेत. बुधवारी सायंकाळी एमआयएम पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी माजी आमदार वारिस पठाण उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी तोबा गर्दी झाली होती.
हेही वाचा - केडीएमसीची 'ती' कारवाई ठरली वादग्रस्त; बिल्डर आणि अधिकाऱ्यांची लेन-देन सीसीटीव्हीत कैद