ETV Bharat / state

Book festival : तरीही वाचन संस्कृती कमी का होत आहे, याची कारणमीमांसा करण्याची गरज आहे? - मिलिंद कुलकर्णी - book festival

उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, ठाणे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ठाणे ग्रंथोत्सवास आज ग्रंथ दिंडीने मोठ्या उत्साहात आरंभ झाला. यावेळी अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी म्हणाले की, ग्रंथालयाच्या संख्येबरोबरच त्यांची गुणवत्ता वाढायला हवी. (book festival)

Book festival
ग्रंथ विक्री आणि प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते
author img

By

Published : Nov 20, 2022, 3:50 PM IST

ठाणे: उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, ठाणे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ठाणे ग्रंथोत्सवास आज ग्रंथ दिंडीने मोठ्या उत्साहात आरंभ झाला. यावेळी अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी म्हणाले की, ग्रंथालयाच्या संख्येबरोबरच त्यांची गुणवत्ता वाढायला हवी. मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती होताना ते वाचण्यासाठी वाचक वाढायला हवेत. ग्रंथालयामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. तरीही वाचन संस्कृती कमी का होत आहे, याची कारणमीमांसा करण्याची गरज आहे. प्रत्येक शाळा, महाविद्यालयात मराठी वाड्मय मंडळ स्थापन झाले पाहिजे. तिथे दरवर्षी वाचन स्पर्धा झाली पाहिजे. यासाठी समाजाची मानसिकता बदलली पाहिजे तरच येणाऱ्या पिढीला वाचनाची आवड निर्माण होईल. असे मत सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी (Milind Kulkarni) यांनी व्यक्त केले. (why the reading culture is decreasing)

Book festival
ग्रंथ विक्री आणि प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते

ग्रंथ विक्री आणि प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते: कल्याण मधील अभिनव विद्या मंदिर शाळेच्या आनंदी गोपाळ सभागृहात आयोजित ग्रंथोत्सवाचे उद्घाटन साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष अरुण म्हात्रे, साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष अरुण म्हात्रे (Arun Mhatre) यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील (Prashant Patil), ठाणे जिल्हा ग्रंथालय संघटनेचे अध्यक्ष चांगदेव काळे, उपाध्यक्ष श्रीधर घारपुरे, सरचिटणीस भिकू बारस्कर, मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय बनसोड, शशिकांत काकड, ज्येष्ठ साहित्यिक जनार्दन ओक आदी उपस्थित होते. आमदार विश्वनाथ भोईर यांनी ग्रंथोत्सवास भेट देऊन शुभेच्छा दिल्या.ग्रंथोत्सव निमित्त आयोजित ग्रंथ विक्री आणि प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.

Book festival
कोरोनानंतर पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रंथोत्सव

कोरोनानंतर पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रंथोत्सव: साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष कवी अरुण म्हात्रे म्हणाले की, कोरोनानंतर पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रंथोत्सव होत असल्याचा आनंद आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाचा, ग्रंथाचा प्रसार व्हायला हवा. सर्वांना पुस्तकाचा लाभ मिळायला हवे यासाठी ग्रंथालय काम करत आहेत. आजची पिढी पुस्तक कमी वाचते. पुस्तकांचा प्रभाव वाढविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे. मराठी वाचन वाढविण्याची शिक्षकांबरोबरच पालकांचीही जबाबदारी आहे. चांगल्या दर्जाची पुस्तकांची निर्मिती करायला हवी त्याच बरोबर ती लोकांपर्यंत पोचविण्यासाठी योजना करावी लागेल. यासाठी ग्रंथोत्सव उपक्रम महत्वाचा आहे. पुस्तकांसारखी गोष्ट आयुष्यात असणं मोठी गोष्ट आहे. पुढचे आयुष्य पुस्तकाशिवाय कठीण होणार आहे. (book festival)

Book festival
ग्रंथोत्सव

वाचन संस्कृती वाढविण्याचा हा उपक्रम: ठाणे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष चांगदेव काळे (Changdev Kale) म्हणाले, साहित्य समृद्ध करण्यासाठी देशात सर्वात जास्त महामंडळे महाराष्ट्र राज्यात आहेत. राज्यात सगळ्यात जास्त ग्रंथालयाची संख्या आहे. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून राज्य शासन लोकांपर्यंत साहित्य पोचवत आहे. वाचन संस्कृती वाढविण्याचा हा उपक्रम आहे. प्रशांत पाटील म्हणाले की, कल्याण सारख्या ऐतिहासिक शहरात ग्रंथोत्सव होत आहे. या सांस्कृतिक शहरात वाचन संस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न आहेत. या ग्रंथोत्सव निमित्ताने आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ नागरिकांनी घ्यावा.

विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम: कल्याणमधील ज्येष्ठ साहित्यिक जनार्दन ओक, श्रीराम साठे, चंद्रशेखर भारती, राजीव जोशी, जितेंद्र भामरे, योगेश जोशी, श्रीकांत पेटकर, भिकू बारस्कर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील यांनी प्रास्ताविकात ग्रंथोत्सव आयोजना मागील भूमिका सांगितली. यावेळी विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. नाट्य परिषदेचे कल्याण शाखेचे अध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी वासुदेवाचे रूप सादर केले. आराधना डान्स अकादमीच्या विद्यार्थ्यांनी सरस्वती वंदना सादर केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.