ठाणे - महापालिका निवडणुका ( Thane Corporation Election ) काही दिवसांवर ठेपल्या असताना आता राजकीय पक्षांची खलबत सुरू झाली आहेत. ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. यासाठी बैठका घेऊन आज महाविकास आघाडीत निवडणुका ( NCP Meeting For Thane Corporation Election ) लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
'लवकरच वाटाघाटीच्या बैठका सुरू होतील'
आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकासआघाडी होण्यासाठी महाविकास आघाडीतील काही नेत्यांचे मतभेद समोर येत असतानाच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसोबत बैठक केली. या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या सोबतच निवडणुकी लढण्याचे मनोदय व्यक्त करून महापालिका निवडणुका आघाडीतच लढण्याचा निर्णय घेतला आहे. हाच निर्णय जितेंद्र आव्हाडांनी बोलून दाखवत महापालिका निवडणुकांसाठी महाविकासआघाडी तयार आहे, तसेच लवकरच वाटाघाटीच्या बैठका सुरू होतील, असे सांगितले.
'आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र' -
ज्या महापालिकांमध्ये मित्र पक्ष पूर्ण सत्यता आहेत, त्यांच्या बाबतीत त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घ्यावा आणि भाजपाला रोखण्यासाठी एकत्र येऊन महाविकासआघाडी तच निवडणुका लढवाव्यात, अशी भूमिका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मांडली. भाजपा हा प्रमुख विरोधी पक्ष आहे आणि भाजपाचा प्रसार रोखण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये एकत्र राहणे आवश्यक असल्याचेदेखील पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. त्यामुळे महाविकास आघाडीत एकमत होऊन आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढेल, हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे.
'शिवसेनेने त्यांच्या नेत्यांच्या सल्ल्याने बोलावे' -
महाविकास आघाडी होत असताना शिवसेना बऱ्याच ठिकाणी पूर्ण बहुमत आहे, अशा वेळी शिवसेनेकडून महाविकासआघाडी बद्दल कोणतीही भूमिका स्पष्ट केली जात नाही आणि त्यांच्या स्थानिक नेत्यांकडून महाविकास आघाडी होणार नाही, अशी भूमिका मांडल्याने जितेंद्र आव्हाड आणि या संदर्भामध्ये शिवसेनेच्या नेत्यांना याबद्दल विचारावे, अशी भूमिका मांडली.