मीरा भाईंदर (ठाणे)- - मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी मीरा रोड विभागात शनिवारी सकाळी 10 सुमारास अचानक भेटी दिल्या. त्यावेळी त्यांनी आरोग्य कर्मचारी काम करत आहेत की नाही, याची पाहणी केली. यावेळी सफाई कर्मचाऱ्यांचे काम पाहून त्यांनी त्यांचे कौतुकही केले. मात्र आयुक्तांच्या अचानक भेटीने सर्व कर्मचारी आवाक झाले.
आयुक्तांची सप्राईस भेट-
मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी मिरारोड परिसरातील सृष्टी, शांती नगर,पेनकर पाडा या परिसरात सकाळी १० च्या दरम्यान अचानक भेटी दिल्या यावेळी रस्त्याची साफसफाई करणारे कर्मचारी यांची शाळा घेतली. चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी यांना विचारपूर केली की, मुकादम, एस आई येतात का कामावर, आपण कितीवेळ काम करता, हे सर्व विचारात असताना कर्मचाऱ्यांनी मात्र आयुक्तांना ओळखलेच नाही. मात्र संवाद साधून झाल्यानंतर तिथून निघताना त्यांनी अखेर त्या कर्मचाऱ्यांना आपल्या शहराचे आयुक्त कोण आहेत? असा सवाल केला. यावेळी कर्मचारी हतबल झाले आणि त्यानंतर ढोले यांनी मीच आयुक्त आहे, असे सांगितले. त्यावेळी कर्मचारी चकित झाले. कर्मचारी यांची चौकशी केल्यानंतर आयुक्त यांनी सफाई कर्मचाऱ्यांचे काम पाहून कौतुक केले.
कर्मचारी अधिकारी वर्गात खळबळ
मीरा भाईंदर शहराचे आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर शहरातील अनेक समस्यांना आयुक्तांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. शहरातील कोविड संदर्भात उपयोजना तसेच प्रत्यक्ष शहरातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी सर्व अधिकारी वर्गाला घेऊन सकाळी वॉक विथ कमिशनरच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागातील समस्या जाणून घेतल्या, तश्या प्रकारे संबंधित अधिकारी वर्गाला कारवाईचे आदेश दिले. यामुळे आयुक्त दिलीप ढोले यांचे एका बाजूला कौतुक झाले. तर अनेक विषयवार टीका देखील झाली. मात्र आज सकाळी मीरा रोड मधील सफाई कर्मचारी यांनी दिलेल्या भेटीने अधिकारी व कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - phone tapping case : सीबीआय संचालक सुबोध जयस्वाल यांना मुंबई पोलिसांचे समन्स
हेही वाचा - BREAKING : इंधनाच्या दरात आणखी वाढ, मुंबईत पेट्रोलला प्रतिलिटरसाठी मोजावे लागणार 110.12 रुपये