ETV Bharat / state

नागरिकांना बेघर करण्यापूर्वी त्यांना हमीपत्र द्या; ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या वतीने पालिकेला मागणी - mahendra mone

धोकादायक इमारतींमध्ये अजूनही वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या घराचा वीज पुरवठा खंडित करण्याबरोबरच पाणी कनेक्शन तोडण्याचा आदेश पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिला होता. मात्र, नागरिकांना बेघर करण्यापूर्वी पालिकेने त्यांना हमी पत्र देण्याची मागणी ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या वतीने करण्यात आली आहे .

धोकादायक इमारती
author img

By

Published : Jun 26, 2019, 11:51 PM IST

ठाणे- शहरात सध्या धोकादायक इमारतीचा प्रश्न तापला आहे. या पार्श्वभूमीवर धोकादायक इमारतींमध्ये अजूनही वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या घराचा वीज पुरवठा खंडित करण्याबरोबरच पाणी कनेक्शन तोडण्याचा आदेश पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिला होता. मात्र, नागरिकांना बेघर करण्यापूर्वी पालिकेने त्यांना हमी पत्र देण्याची मागणी, ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या वतीने करण्यात आली आहे.

हमीपत्र मिळाल्याशिवाय घरे खाली केल्या जाणार नसल्याचे सांगतांना संजीव साने

या हमीपत्रामध्ये इमारतीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीचे नाव तसेच राहत्या घराचे मोजमाप आणि धोकादायक इमारत म्हणून ही इमारत तोडण्यात येत असल्याचा उल्लेख असावा, अशी मागणी करण्यात आली आहे. हमीपत्र मिळाल्याशिवाय घरे खाली केली जाणार नसून या मुद्द्यावरून धोकादायक इमारतींमध्ये राहणारे नागरिक शुक्रवारी पालिका मुख्यालयासमोर निदर्शने करणार असल्याची माहिती संजीव साने यांनी दिली आहे.

शहरातील बहुतांश अतिधोकादायक इमारती खाली करण्यात आल्या आहेत. मात्र अजूनही ज्यांनी इमारती खाली केलेल्या नाहीत, अशा लोकांच्या घरावर ही कारवाई करण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ, नये म्हणून पालिकेने ही पाऊले उचलली असली तरी काही इमारती धोकादायक नसताना त्या धोकादायक ठरवून विकासकांच्या फायद्यासाठी या इमारती रिकाम्या करण्यात येत असल्याचा आरोप साने यांनी केला आहे. एकदा इमारत रिकामी करुन पडल्यानंतर त्या रहिवाशांचा राहण्याचा दावा निघून जात असल्याने हे हमीपत्र अत्यंत महत्त्वाचे असून ते घेतल्याशिवाय इमारत खाली करू नये, असे आवाहन साने यांनी केले आहे. तर यामध्ये घराचे मोजमाप देखील अतिशय महत्त्वाचे असल्याचे अभियानाचे पदाधिकारी शाळीग्राम यांनी सांगितले.

इमारत खाली करताना भोगवटदारांची यादी, त्या इमारतीमधील घरांचे मोजमाप, हे संबंधित प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांना नगर विकास खात्याला देणे बंधनकारक असल्याचे महेंद्र मोने यांनी सांगितले. जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी २ एफ एस आय देण्यासाठी राज्य शासनाकडे चार वर्षांपासून पाठपुरावा सुरु असून अद्याप सरकारकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली झाल्या नसल्याचे मोने यांनी सांगितले. जर २ एफएसआय मंजूर केले तर साडेचार हजार इमारतींचा पुनर्विकास होणार असल्याचे मोने यांनी सांगितले आहे.

बॅनरबाजी करून नागरिकांची फसवणूक

क्लस्टरमध्ये हक्काची घरे मिळणार अशी बॅनरबाजी करून नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप यावेळी संजीव साने यांच्याकडून करण्यात आला आहे. अधिकृत घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या मालकीची हक्काची घरे मिळणार असून अनाधिकृत आणि धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना भाडे तत्वावरच घरे मिळणार असतानाही नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचे साने यांनी सांगितले. किसन नगर भागात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा अशा आशयाचा बॅनर लागला असल्याचे त्यांनी सांगितले .

क्लस्टरमधील अटी देखील फसव्या

शहारत क्लस्टर योजना राबवण्यासाठी सध्या नागरिकांचा सर्व्हे सुरु असून यामध्ये नागरिकांना देण्यात येणाऱ्या अर्जामध्ये काही प्रश्न विचारण्यात येत आहेत. या अर्जात देशात कुठेही आपले मालकीचे घर आहे का ? यावर सर्व नागरिक 'हो' अशी उत्तरे देत असल्याने नागरिकांना क्लस्टर योजनेमधून अपात्र करण्याचा महापालिकेचा डाव असल्याचे साने यांनी सांगितले .

Intro:हमीपत्र दिल्याशिवाय घरे खाली न करण्याचे अभियानाचे आवाहन -
शुक्रवारी धोकादायक इमारतीमध्ये राहणारे नागरिक करणार पालिका मुख्यालयासमोर निदर्शने Body:

धोकादायक इमारतींमध्ये अजूनही वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या घराचा वीज पुरवठा खंडित करण्याबरोबरच पाणी कनेक्शन तोडण्याचा आदेश पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिला असला तरी, धोकायदाक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना बेघर करण्यापूर्वी पालिकेने त्यांना हमी पत्र देण्याची मागणी ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या वतीने करण्यात आली आहे . या हमीमात्रामध्ये इमारतीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीचे नाव तसेच राहत्या घराचे मोजमाप आणि धोकादायक इमारत म्हणून ही इमारत तोडण्यात येत आहे असा उल्लेख असावा अशी मागणी करण्यात आली आहे . हे हमीपत्र मिळाल्याशिवाय घरे खाली करू नये आवाहन करण्याबरोबरच या मुद्द्यावरून धोकादायक इमारतींमध्ये राहणारे नागरिक शुक्रवारी पालिका मुख्यालयासमोर निदर्शने करणार असल्याची माहिती संजीव साने यांनी दिली आहे .

ठाणे शहरात सध्या धोकादायक इमारतींचा प्रश्न तापला असून दोन दिवसांपूर्वीच अशा इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा वीज पुरवठा आणि पाणी पुरवठा खंडित करण्यात यावा असे आदेश दिले आहेत . अतिधोकादायक इमारती बहुतांश खाली करण्यात आल्या आहेत . मात्र अजूनही ज्यांनी इमारती खाली केलेल्या नाहीत अशा लोकांच्या घरावर ही कारवाई करण्यात येणार आहे . कोणत्याही प्रकारची जीवित हानी होऊ नये म्हणून पालिकेने ही पाऊले उचलली असली तरी काही इमारती धोकादायक नसताना त्या धोकादायक ठरवून विकासकांच्या फायद्यासाठी या इमारती रिकाम्या करण्यात येत असल्याचा आरोप साने यांनी केला आहे . एकदा इमारत रिकामी केली आणि इमारत पडल्यानंतर त्या रहिवाशांचा राहण्याचा दावा निघून जात असल्याने हे हमीपत्र अत्यंत महत्वाचे असून ते घेतल्याशिवाय इमारत खाली करू नये असे आवाहन साने यांनी केले आहे . तर यामध्ये घराचे मोजमाप देखील अतिशय महत्वाचे असल्याचे अभियानाचे पदाधिकारी शाळीग्राम यांनी सांगितले .
इमारत खाली करताना भोगवटदारांची यादी ,त्या इमारतीमधील घरांचे मोजमाप हे संबंधित प्रभाग समितीच्या साह्याय्यक आयुक्तांना नगर विकास खात्याला देणे बंधाकरक असल्याचे महेंद्र मोने यांनी सांगितले . जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी २ एफ एस आय देण्यासाठी राज्य शासनाकडे चार वर्षांपासून पाठपुरावा सुरु असून अद्याप सरकारकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली झाल्या नसल्याचे मोने यांनी सांगितले . जर २ एफएसआय मंजूर केल्यास साडेचार हजार इमारतींचा पुनर्विकस होणार असल्याचे मोने यांनी सांगितले .

बॅनरबाजी करून नागरिकांची फसवणूक -
क्लस्टरमध्ये हक्काची घरे मिळणार अशी बॅनरबाजी करून नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप यावेळी संजीव साने यांच्याकडून करण्यात आला आहे . अधिकृत घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या मालकीची हक्काची घरे मिळणार असून अनधिकृत आणि धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना भाडे तत्वावरच घरे मिळणार असतानाही नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचे साने यांनी सांगितले . किसन नगर भागात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा अशा आशयाचा बॅनर लागला असल्याचे त्यांनी सांगितले .

क्लस्टरमधील अटी देखील फसव्या -
शहारत क्लस्टर योजना राबवण्यासाठी सध्या नागरिकांचा सर्व्हे सुरु असून यामध्ये नागरिकांना देण्यात येणाऱ्या अर्जामध्ये काही प्रश्न विचारण्यात येत आहेत . या अर्जात देशात कुठेही आपले मालकीचे घर आहे का ? यावर सर्व नागरिक हो अशी उत्तरे देत असल्याने नागरिकांना क्लस्टर योजनेमधून अपात्र करण्याचा महापालिकेचा डाव असल्याचे साने यांनी सांगितले .

BYTE : संजीव साने ( ठाणे मतदाता जागरण अभियान )
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.