ETV Bharat / state

Thane Fire : शिळफाटा परिसरातील वेअरहाऊसला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही

author img

By

Published : May 30, 2023, 7:46 AM IST

शिळफाटा परिसरातील वेअरहाऊसला भीषण आग लागल्याने खळबळ उडाली. या आगीत मालमत्तेचे नुकसान झाले असून अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Thane Fire
वेअरहाऊसला भीषण आग

ठाणे : शिळफाटा परिसरात असलेल्या वेअरहाऊसला भीषण आग लागल्याने खळबळ उडाली आहे. मात्र या आगीत कोणतीही जावितहानी झाली नसल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. आगीत लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

  • #WATCH | Thane, Maharashtra: A fire broke out in a warehouse near the Royal Classic Hotel in the Shilphata area of Thane & the fire spread from one to three warehouses. Seven fire engines reached the spot. No casualties were reported. The cause of the fire is currently unknown:… pic.twitter.com/vepgieWyFM

    — ANI (@ANI) May 30, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शिळफाटा परिसरात वेअरहाऊस : ठाण्यातील शिळफाटा परिसरात रॉयल क्लासिक हॉटेलच्या बाजुला असलेल्या वेअरहाऊसला आग लागल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले होते. आग लागल्याची माहिती तात्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यामुळे घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले. सध्या शिळफाटा परिसरात लागलेली ही आग अटोक्यात आली असून अग्निशमन दलाच्या जवानांकडून कुलींगचे काम सुरू आहे.

कोणतीही जीवितहानी नाही : शिळफाटा परिसरात वेअरहाऊसला लागलेल्या भीषण आगीत मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे नागरिकांनी निश्वास सोडला आहे. दरम्यान ही आग कसामुळे लागली, याचे कारण मात्र अद्यापही निष्पन्न झाले नसल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

हेही वाचा -

Fire Break Out In Chembur : चेंबूरसह भिवंडीतही आगीचे तांडव, स्वस्तिक चेंबरच्या चौथ्या मजल्यावर तर भिवंडीत गोडाऊनला आग

Fire In Market Yard : पुण्यातील मार्केट यार्डमधील कागद गोडाऊनला भीषण आग, रद्दीसह वाहने जळून खाक

Pune Fire : पुण्यातील आयटी पार्कमध्ये लागलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश; शॉर्टसर्किटमुळे लागली आग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.