ठाणे : भिवंडी - कल्याण मार्गावरील रांजणोली ग्रामपंचायत हद्दीत लाकडाचे फर्निचर करण्याचा कारखाना, गोदाम आहे. या फर्निचरसह गोदामाला आज सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीने काही क्षणातच रुद्ररूप धारण करत संपूर्ण कारखाना, गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. दुसरीकडे आगीच्या घटनेची माहिती मिळताच आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या ३ गाड्या दाखल झाल्या होत्या. त्यानंतर अनेक पाण्याच्या टँकरच्या साहाय्याने अडीज तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, या भीषण आगीत संपूर्ण लाकडी फर्निचर, गोदामात साठवून ठेवलेली लाकडे जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
आगीचे कारण अस्पष्ट : या भीषण आगीच्या घटनेमुळे भिवंडी कल्याण मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने अग्निशमन दलाच्या गाड्या उशिराने घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सध्या घटनास्थळी कुलिंगचे काम सुरु असून अग्निशमन दलाची एक गाडी दाखल आहे. तर आगीचे कारण अध्यापही समजू शकले नसून सुदैवाने आग लागली. तेव्हा वखार, गोदामात असलेले कामगार वेळेतच बाहेर पडल्याने कोणालाही दुखापत झाली नाही. या आगीच्या घटनेची नोंद कोनगाव पोलीस ठाण्यात करण्यात येऊन पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
सात दिवसापूर्वीच केमिकल ड्रमचा स्फोट : स्फोटात दोन जण जागीच ठार भिवंडी शहरी व ग्रामीण भागातील गोदाम पट्ट्यात लहान मोठ्या भीषण आगीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने ज्वालामुखीचा तालुका अशी ओळख भिवंडी तालुक्याची निर्माण झाली आहे. गेल्या वर्षभरात सुमारे २०० हुन अधिक आगीच्या घटना घडल्याच्या भिवंडी अग्निशमन दलाच्या कार्यलयातील नोंदीवरून उघडकीस आले आहे. त्यातच यंदाच्या जानेवारी महिन्यातही आगीच्या १० घटना तर १ फेब्रुवारी रोजी सकाळी साडे आठ वाजल्याच्या सुमारास भिवंडीत अग्नी तांडवच्या दुर्घटनेत रमजान कुरेशी (वय 46) व ईशराईल शेख (वय 35) असे जागीच ठार झालेल्याची नावे आहेत. उघड्यावरच भंगार गोडाऊनमध्ये केमिकलचा वापर करून पिशव्या धुण्याचे काम आज सकळाच्या सुमारास दोघे मृतक करीत होते. त्यातच एक जनाला बिडी ओढण्याची तलप लागल्याने त्याने बिडी पेटवत केमीकल ड्रमची साफसफाई करत असतानाच बिडीची ठींगणी त्या केमीकल ड्रममध्ये पडल्याने ड्रामाचा स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूच्या इमारतींचे खिडकीचे काचे देखील फुटले आहेत.
हेही वाचा - Pradhan Mantri Awas Yojana Cancelled : प्रधानमंत्री आवास योजना रद्द; नवीन निविदा काढण्याचा शासनाचा निर्णय