ETV Bharat / state

लग्नाचे आमिष दाखवून विवाहीत प्रियकराचा तरुणीवर अत्याचार - विवाहित प्रियकराचा तरुणीवर अत्याचार

दर्शन भेकरे याने पीडित तरुणीशी ओळख करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. दर्शन याचे लग्न झालेले असतानाही त्याने पीडित तरुणीला लग्नासाठी वारंवार विचारणा केली. तिला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला.

तरुणीवर अत्याचार
तरुणीवर अत्याचार
author img

By

Published : Dec 18, 2019, 6:25 PM IST

ठाणे - लग्न झालेले असतानाही एका तरुणाने १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची घटना समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी दर्शन भेकरे या आरोपीला अटक केली आहे.

पीडित तरुणी ठाण्याच्या मानपाडा परिसरात राहते. काही महिन्यांपूर्वी कल्याण पूर्व चिंचपाडा परिसरात राहणाऱ्या दर्शन भेकरे याने पीडित तरुणीशी ओळख करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. दर्शन याचे लग्न झालेले असतानाही त्याने पीडित तरुणीला लग्नासाठी वारंवार विचारणा केली. तिला लग्नाचे आमिष दाखवून मेट्रो मॉल, गोव्यातील हॉटेल्स, बदलापूर पूर्व, मित्राच्या घरी, संगमेश्वर आणि रत्नागिरी अशा विविध ठिकाणी फिरायला नेण्याच्या बहाण्याने तिच्यावर पाच महिने अत्याचार केला.

हेही वाचा - ...मग राज्य सरकार हवचं कशाला? निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

पीडित तरुणीने विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठून आरोपी दर्शन भेकरे याच्या विरूध्द तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक केली. मात्र, ही घटना कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने विठ्ठलवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीला कोळशेवाडी पोलिसांच्या स्वाधीन केले. पुढील तपास कोळशेवाडी पोलीस करत आहेत.

Intro:kit 319Body: महाविद्यालयीन तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून विवाहीत प्रियकराचा बलात्कार

ठाणे : विवाह झालेला असतानाही एका वासनांधाने १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यांनतर तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात पीडितेच्या जबानीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर बलात्काराचा गुन्हा कोळशेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने हा गुन्हा त्या पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. दर्शन भेकरे असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणी ठाण्याच्या मानपाडा परिसरात राहते. काही महिन्यापूर्वी कल्याण पूर्व चिंचपाडा परिसरात राहणार आरोपी दर्शनने पीडित तरूणीशी ओळख करून तिच्याशी जवळीक साधून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले , खळबळजनक बाब म्हणजे आरोपी दर्शन याचे लग्न झालेले असताना त्याने पीडित तरूणीला तु माझ्याशी लग्न करशील का ? असे वारंवार विचारणा केली. तसेच तिला लग्नाचे अमिष दाखवून कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेट्रो मॉल , गोव्यातील हॉटेल्स, बदलापुर पुर्व, मित्राच्या घरी, संगमेश्वर तसेच रत्नागिरी अश्या विविध ठिकाणी फिरायला नेण्याच्या बहाण्याने तिच्यावर तब्बल ५ महिने वेळोवेळी अत्याचार केला.
या प्रकरणी पीडित तरूणीने विठ्ठलवाडी पोलिस ठाणे गाठून आरोपी दर्शन याच्याविरूध्द तक्रार दाखल करताच पोलिसांनी त्याला अटक केली. ही घटना कोळशेवाडी पोलस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने विठ्ठलवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपी दर्शन याला कोळशेवाडी पोलिसांच्या स्वाधीन केले असून तो गुन्हा पुढील तपासाकामी वर्ग करण्यात आला आहे.

Conclusion:rep
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.