ETV Bharat / state

Marathi Announcement Issue : विमानतळावर उद्घोषणा मराठीतून हवी, ठाण्यातल्या लहानग्या अथर्वची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - अथर्व जयेश वगळ

Marathi Announcement Issue : मुंबईतील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय विमानतळ आणि विमानात मराठीतून उद्घोषणा व्हावी (Marathi Announcement On Airport) यासाठी ठाण्यातील अथर्व वगळ या लहानग्याने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिलं आहे. इतर राज्यांना आपल्या राज्यभाषेचा अभिमान आहे तसाच महाराष्ट्रात देखील आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान असला पाहिजे व सगळीकडे मराठीच वापरली गेली पाहिजे असा आग्रह अथर्वने केला.

Marathi Announcement Issue
अथर्वची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 26, 2023, 7:40 PM IST

विमानतळावरील मराठीत उद्‌घोषणेबाबत अथर्व वगळची प्रतिक्रिया

ठाणे Marathi Announcement Issue : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून दर दिवशी लाखो प्रवाशी देश, विदेशात जाण्यासाठी उड्डाण करतात. त्यावेळी या विमानतळावर केवळ इंग्रजी मधूनच उद्घोषणा होत असल्याने ग्रामीण भागातून आलेल्या प्रवाशांना दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. (Child artist Atharva Vagal) अनेकदा ज्येष्ठ नागरिक आपल्या मुलांकडे परदेशी जात असतात. त्यावेळी मराठीतून उद्घो‌षणा झाली तर त्यांना दिलेली माहिती समजण्यास सोपे जाईल. (Atharva Vagal statement to CM shinde) परंतु, आंतरराष्ट्रीय तर सोडाच राष्ट्रीय विमानतळावर देखील अशा प्रकारची मराठीतून उद्घोषणा होत नसल्याने सामान्य नागरिकांची मोठी कुचंबणा होते.

राज्यातील विमानतळांनाच मराठीचे वावडे का - शूटिंगच्या निमित्ताने देशात आणि परदेशात प्रवास करणाऱ्या ठाण्यातील सिंघानिया शाळेत इयत्ता नववीत शिकणाऱ्या अथर्व जयेश वगळ या केवळ १४ वर्षीय लहानग्याला ही बाब खटकली. प्रत्येक राज्यातील विमानतळावर त्यांच्या स्थानिक राज्यभाषेतून उद्‌घोषणा होते. परंतु आपल्या राज्यातील विमानतळांनाच मराठीचे वावडे का आहे? असा प्रश्न त्याला पडला आणि त्याने याचा पाठपुरावा करण्याचे ठरवले. त्याने ही गोष्ट आपल्या वडिलांच्या लक्षात आणून देताच त्यांनी एक निवेदन तयार करून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मराठी भाषेचा अभिमान असलाच पाहिजे व सर्व सरकारी कार्यालयांप्रमाणे विमानतळ आणि विमानातील उद्घोषणा या मराठीतूनच झाल्या पाहिजेत अशी आग्रही भूमिका त्याने मांडली. जशी रेल्वे स्थानकावर इंग्रजी, हिंदी आणि मराठीतून उद्घोषणा होते तशीच ती विमानतळावर आणि विमानात देखील व्हावी अशी मागणी त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

लहानपणापासूनच चळवळ्या अथर्व : अथर्व हा लहानपणापासूनच अत्यंत चळवळ्या आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मुलगा आहे. त्याने प्लास्टिक बंदीसाठी केलेल्या कामाची दखल अनेक मान्यवरांनी घेतली. त्यासाठी त्याला प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात देखील आले आहे. त्याने ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटरमध्ये पाणी गळत असल्याचे लक्षात येताच मोठी धावपळ करून निधी मिळवून काम करून घेतले होते. विशेष म्हणजे अथर्व हा एक उत्कृष्ट बालकलाकार असून तो अत्यंत कमी वयापासून सिनेमा, सिरीयल आणि अ‍ॅड फिल्ममध्ये काम करत आहे. यात विशेष बाब म्हणजे, शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावरील आलेल्या 'धर्मवीर' या सिनेमाच्या दोन्ही भागात त्याने भूमिका केली आहे. पहिल्या भागात त्याने मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची बाल भूमिका अत्यंत उत्कृष्टरीत्या वठवली आहे.

अथर्वने याआधी केलेल्या मागण्या : ठाण्याचे आयुक्त यांना निवेदन देऊन ठाणे टीएमटी बसेसमध्ये प्रवाश्यांच्या सुविधेकरीता 'ऑनलाईन' पद्धतीने फोन पे, गुगल पे, पेटियमद्वारे व 'व्हॅट्ससॅप द्वारे' तिकीट काढण्याची सुविधा व टीएमटी बस थांब्यावर तसंच ठाण्यात एलईडी होर्डिंगवर जाहिरात प्रदर्शित कराव्यात अशी देखील अथर्वने पालिका आयुक्तांकडे मागणी केलेली होती. जेणेकरून नागरिकांना सुविधा देखील मिळतील त्यासोबत पालिकेला उत्पन्न देखील प्राप्त होईल.

हेही वाचा:

  1. Defamation Case : उद्धव ठाकरे, संजय राऊतांना मोठा धक्का; अब्रू नुकसानीचा खटला नियमितपणे चालणार
  2. PM Modi Shirdi Visit : मोदींच्या दौऱ्यासाठी लोकांना घ्यायला आलेल्या बसेस मराठा बांधवांनी पाठविल्या परत
  3. Satish Maneshinde : मराठा आरक्षण आंदोलकांचा खटला मोफत लढवणार; अ‍ॅड सतीश मानेशिंदे यांची माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.