ठाणे : Maratha Protest Thane Bandh : जालन्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषणादरम्यान झालेल्या लाठीचाराच्या विरोधात महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये बंदची हाक (Thane Bandh) देण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. अशातच मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये सर्वपक्षीय मराठा समन्वयकांनी ठाणे बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट (Sharad Pawar), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि मनसेने पाठिंबा दर्शवला आहे.
जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू : ठाणे बंदमध्ये भाजपाचे पदाधिकारी देखील सक्रिय होते. मात्र, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या बंदपासून दूर आहेत. सरकारने सर्वपक्षीय बैठक देखील बोलवली आहे. जरांगे पाटील यांनी पाणी आणि औषध त्याग करत आंदोलन (Maratha Reservation Protest)देखील सुरू ठेवले आहे. त्यामुळे आता हे आंदोलन कोणत्या वळणावर जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मराठा आंदोलकांचा थेट सरकारला इशारा : मनोज जरांगे यांना जर काही झालं तर महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलनाचा इशारा मराठा समाजाकडून देण्यात (Maratha Reservation Protest) आला आहे. आज सकाळपासूनच रेल्वे स्थानक परिसर, नौपाडा, वागळे स्टेट, घोडबंदर रोड परिसरात बंदचा परिणाम दिसला. काही आस्थापना नागरिकांनी स्वतःहून बंद ठेवल्या तर काही ठिकाणी मराठा कार्यकर्त्यांनी दिलेल्या आवाहनाला नागरिकांनी पाठिंबा दिला. आतापर्यंत कोणताही अनुचित प्रकार हा ठाण्यात पाहायला मिळालेला नसून, पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात ठेवलेला आहे.
पोलिसांनी अनेकांना घेतलं ताब्यात : ठाणे बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून शहरातील विविध भागात लाऊड स्पीकरवर आवाहन देखील करण्यात येत आहे. परिवहन सेवा व्यवस्थितपणे सुरू असून शहरातील शाळांना सुट्टी दिलेली नाही.
हेही वाचा -