ETV Bharat / state

मराठा आरक्षण : नवी मुंबईत मराठा समाजाचे आंदोलन

राज्य शासनाने आर्थिक मागास घटक गटात समावेश करून मराठा समाजाची फसवणूक केली आहे. असा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने केली. यावेळी आरक्षण बाबतचा अध्यादेश फाडून सरकारचा निषेध केला, तर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

maratha community agitation for maratha reservation in navi mumbai
मराठा आरक्षण:नवी मुंबईत मराठा समाजाचे आंदोलन
author img

By

Published : Jun 1, 2021, 10:31 PM IST

Updated : Jun 1, 2021, 10:42 PM IST

ठाणे - मराठा समाजाच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून आरक्षणासाठीचा लढा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण लागू व्हावे, यासाठी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुरुवारी नवी मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी आरक्षणाबाबतचा अध्यादेश फाडून निषेध करण्यात आला.

मराठा आरक्षण : नवी मुंबईत मराठा समाजाचे आंदोलन
राज्य शासनाने मराठा समाजाची फसवणूक केल्याचा मराठा समाजाचा आरोपराज्य शासनाने आर्थिक मागास घटक गटात समावेश करून मराठा समाजाची फसवणूक केली आहे. असा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने केली. यावेळी आरक्षण बाबतचा अध्यादेश फाडून सरकारचा निषेध केला, तर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.6 जूनला रायगडावर राज्यव्यापी आंदोलन करणार राज्य शासनाने आर्थिक निकषावर आधारित दिलेले आरक्षण निव्वळ फसवणूक असून याचा निषेध करत आहोत असे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. येत्या 6 जून रोजी राज्यव्यापी आंदोलन रायगडावर करणार असून या आंदोलनाचे नेतृत्व खासदार छत्रपती संभाजी राजे करणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली. शेतकरी, डॉक्टर, अभियांत्रिकी पदवीधारक यांच्या प्रतीकात्मक रुपात आंदोलनकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

Last Updated : Jun 1, 2021, 10:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.