ठाणे - ठाण्यातील आनंद नगर टोल नाक्यावर सीसीटीव्ही फुटेजमधील इनोव्हा गाडी आता तपासाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. ही कार अंबानी यांच्या निवासस्थानी जिलेटिनने भरलेल्या स्कॉर्पियोसोबत दिसली होती. या कारमध्ये पीपीई किट घालून लोक फिरताना पाहायला मिळाले होते. आता ही गाडी एटीएसला चोरीच्या स्कॉर्पियो प्रकरणात दाखल गुन्ह्यात हवी आहे. त्यासोबत जिलेटिनविषयीच्या दाखल असलेल्या गुन्हे प्रकरणात एनआयएलाही हिचा शोध घ्यायचा आहे. आनंदनगर टोल नाक्यावर ही गाडी मुंबईकडे जात असताना सीसीटीव्हीमध्ये चालकाने फेस शील्ड घातलेले दिसत आहे.
हेही वाचा - मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी एटीएसने नोंदवला सचिन वझेंचा जवाब
इनोव्हाचा शोध सुरू, सरकारी सीरीजची नंबर प्लेट
या इनोव्हाचा तपास केला असता, त्यावर असलेल्या नंबरप्लेटवर mh 04 an या सीरीजमधील नंबर होता. ही सीरीज सरकारी वाहनासाठी राखीव असलेली सीरीज आहे. मात्र, ही सीरीज 4500 क्रमांकापर्यंत बंद झाली आहे. परंतु, इनोव्हा कारवरील नंबर हा 4500 च्या पुढील असल्यामुळे ही नंबर प्लेट बोगस असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळे आता या इनोव्हाचे गूढ आणखी वाढले आहे.
ठाणे एटीएसचे पथक मनसुख हिरेन यांच्या घराखालून येऊन निघून गेली. या गाडीत ठाणे एटीएस पथक होते. याच स्विफ्ट कारमध्ये हिरेन यांची पत्नी आणि मुलगा यांना काल ठाणे एटीएसने चौकशीसाठी बोलावले होते. मनसुख हिरेन प्रकरणात एटीएसची पाच पथक ठाणे शहरात विविध पद्धतीने तपास करत आहेत. पुरावे गोळा करत आहेत. ठाणे एटीएसच्या 2 अधिकाऱ्यांचे एक पथक आज मुंबईच्या दिशेने आले आहे. हे पथक मुंबई एटीएस ऑफिसच्या दिशेने गेले आहे, अशी माहिती मिळत आहे. हिरेन यांच्या कुटुंबाचा जबाब हा काल ठाणे एटीएसने नोंदवला आहे.
हेही वाचा - अंबानींना धमकी देणारा जैश-उल-हिंदचा ग्रुप तिहार जेलचा