ETV Bharat / state

ठाण्यात माजिवाडा पुलावरून कंटेनर १०० फूट खाली कोसळला, चालकाचा मृत्यू - ठाणे माजिवाडा पूल अपघात

आज पहाटे घोडबंदरवरून औषधाने भरलेला कंटनेर नाशिककडे जात होता. यावेळी माजिवाडा पुलावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर पुलावरून १०० फूट खाली कोसळला. यामध्ये आझाग नावाचा चालक जागीच ठार झाला, तर सोबत असलेला क्लिनर गंभीर जखमी झाला आहे.

ठाण्यात माजिवाडा पुलावरून कंटेनर १०० फूट खाली कोसळला, चालकाचा मृत्यू
thane container accident container accident thane news ठाण्यात माजिवाडा कंटेनर अपघात container accident thane news majiwada bridge accident ठाणे माजिवाडा पूल अपघात ठाणे अपघात बातमी
author img

By

Published : Jul 25, 2020, 11:58 AM IST

ठाणे - सर्वात मोठा आणि वळणदार असलेल्या माजिवाडा पुलावर पहाटेच्या सुमारास अपघात झाला आहे. अवघड वळणावरून औषधाने भरलेला कंटेनर पुलावरून तब्बल १०० फूट खाली कोसळला. यामध्ये कंटेनर चालकाचा मृत्यू झाला आणि क्लिनर जखमी झाला आहे.

आज पहाटे घोडबंदरवरून औषधाने भरलेला कंटनेर नाशिककडे जात होता. यावेळी माजिवाडा पुलावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर पुलावरून १०० फूट खाली कोसळला. यामध्ये आझाग नावाचा चालक जागीच ठार झाला, तर सोबत असलेला क्लिनर गंभीर जखमी झाला आहे. कापूरबावडी पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जखमीला रुग्णालयात हलविण्यात आले. तसेच अपघात झाल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती. ते सुरळीत करण्यात आली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास कापूरबावडी पोलीस करत आहे.

या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहे. तसेच अनेक अवघड वळणे देखील आहेत. त्यामुळे अनेकदा याठिकाणी अपघात होत असतात. काही दिवसांपूर्वी एक दुचाकी चालक देखील पुलावरून खाली पडल्यामुळे मृत्युमुखी पडला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.