ठाणे CM Shinde on Udhav Thackrey : आपल्यासोबत अर्धी मुंबई घेऊन मुंब्य्रात काही फुसके बार येऊन गेले. मात्र आलेले फुसके बार वाजलेच नाहीत, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे त्यांच्यावर टीका केलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिवाळी सणानिमित्त आपल्या मतदारसंघांमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना
मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टिका : मुंब्रा कौसा इथं शिवसेनेच्या तोडलेल्या शाखेला भेट देण्यासाठी उद्धव ठाकरे हे शनिवारी मुंब्य्रात आले होते. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि आपली ताकद दाखविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाडांनीही आपल्या बालेकिल्ल्यात शक्तिप्रदर्शन केलं. परंतु, उद्धव ठाकरे यांना पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचे कारण देत माघारी जाण्यास भाग पाडलं. या संपूर्ण प्रकारावर जोरदार टीका केलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, नरेश म्हस्के आणि शिवसेनेच्या महिलांनी जोरदार फटाके फोडत या फुसक्या फटाक्यांना पळवून लावलं. या ठिकाणी शिवसेनेची शाखा बांधत असून तिथं न्यायमंदिर बनेल असंही शिंदेंनी सांगितलं.
राज्यावरील संकट दूर होवो- जितेंद्र आव्हाड यांना ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांची जागा दाखविल्याचं त्यांनी सांगितलं. यावर्षी ते सातव्या नंबरावर होते, तर पुढच्या निवडणुकीत ते दस नंबरी असतील अशी खोचक टीकाही मुख्यमंत्र्यांनी आव्हाडांवर केलीय. तसंच यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत राज्यावरील संकट दूर होवो अशी प्रार्थना केली. दरवर्षी आयोजित होणाऱ्या कोपरी येथील या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेनेचे अनेक नेतेदेखील सहभागी झाले होते. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कारदेखील करण्यात आला.
दम असेल तर समोर या : खरा बुलडोझर काय असतो, हे दाखवण्यासाठी मुंब्य्रात आल्याचं उद्धव ठाकरे यांनी शनिवारी म्हटलं होतं. हिंमत असेल, तर पोलिसांना बाजूला करून पुढं या, असं थेट आव्हान उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला दिलं होतं. या चोरट्यांना आज पोलिसांनी संरक्षण दिलं. मात्र या चोरट्यांनी मधमाशीच्या पोळ्यात हात घातलाय, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. आगामी निवडणुकीत या चोरांचं डिपॉझिट जप्त करण्याचं आवाहन उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केलं. मुंब्र्यातील शिवसेनेच्या शाखेवरून उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्यात चांगलेच वाक्युद्ध रंगल्याचे दिसत आहे.
हेही वाचा :
- Uddhav Thackeray Mumbra Visit : दम असेल तर समोर या; उद्धव ठाकरेंचं शिंदे गटाला आव्हान
- Jitendra Awhad On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांना पाठवलेली नोटीस रद्द, मुंब्य्रात पोलिसांची दहशत - आव्हाड
- Sanjay Raut On CM : मुंब्र्यात विरोधकांच्या छातीवर पाय देऊन समाचार घेणार; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल