ETV Bharat / state

Heavy Rainfall In Thane : पावसामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर; जिल्हाधिकारी शिनगारे यांची माहिती

जिल्ह्यात मुसळधार पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या स्थितीचा जिल्हाधिकारी शिनगारे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी आढावा घेतला आहे.

Thane rain
नागरिकांचे जनजीवन विस्कळीत
author img

By

Published : Jul 19, 2023, 10:48 PM IST

Updated : Jul 19, 2023, 10:57 PM IST

ठाणे : जिल्ह्यात सर्व यंत्रणा सतर्क राहून मदत व बचाव कार्य करत आहेत. पावसामुळे झालेल्या परिस्थितीचा जिल्हाधिकारी शिनगारे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी आढावा घेतला आहे. तसेच जिल्ह्यातील महसूल, जिल्हापरिषद व आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच 20 जुलै रोजी ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा व भरतीची वेळ याचा विचार करून, उद्या जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केल्याचे जिल्हाधिकारी शिनगारे यांनी सांगितले आहे.

परिस्थितीचा घेतला आढावा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अपर मुख्य सचिव यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती घेतली. तत्पूर्वी जिल्हाधिकारी शिनगारे व जिंदल यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पाणी पुरवठा विभाग, नगरपालिका व महानगरपालिकांचे अधिकारी तसेच इतर सर्व संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला व सूचना दिल्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) गोपीनाथ ठोंबरे, तहसीलदार संजय भोसले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अनिता जवंजाळ आदी यावेळी उपस्थित होते.

कुटुबांचे तातडीने केले स्थलांतर : जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये पडलेला पाऊस, पावसामुळे बंद पडलेले रस्ते, पूल, नागरिकांचे स्थलांतर व त्यांची राहण्याची पर्यायी सोय आदींची माहिती त्यांनी प्रशासनाकडून घेतली. कालपासून ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी वाढल्यामुळे नदी किनाऱ्यावरील गावातील बाधित कुटुबांचे तातडीने स्थलांतर करून त्यांच्या राहण्याच्या, जेवण्यांची पर्यायी व्यवस्था करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. अंबरनाथ, बदलापूर रेल्वे मार्गावर पाणी साचल्यामुळे लोकल वाहतूक बाधित झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रवास करताना काळजी घ्यावी. तसेच नदी, नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असताना कोणतेही वाहन त्यावरून नेऊ नये, अथवा त्यावरून रस्ता ओलांडू नये. तसेच आकस्मिक संकट अथवा अडचण आल्यास, स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्याच्या सूचना शिनगारे यांनी दिल्या आहेत.

आरोग्य यंत्रणा सतर्क : यावेळी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचाही जिल्हाधिकारी महोदयांनी आढावा घेतला. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या रोगाचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणेला सतर्क रहाण्याच्या सूचना केल्या आहेत. जिल्ह्यातील आरोग्य केंद्रे सुरू ठेवण्यात यावीत व गरजूना तातडीने उपचार करण्यात यावे. आवश्यक तो औषधांचा साठा तयार ठेवावा. पाणी पुरवठा विभागाने नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होईल याची काळजी घ्यावी. महापालिका क्षेत्रात जेथे पाणी थांबून राहते त्या ठिकाणी पंप बसवून पाण्याचा तातडीने निचरा होईल, हे पहावे. तसेच ज्या घरांमध्ये पाणी जाण्याची शक्यता आहे, तेथील नागरिकांना तातडीने स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने पर्यायी जागेवर हलविण्याच्या सूचनाही शिनगारे यांनी यावेळी दिल्या.

जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी : हवामान खात्याने ठाणे जिल्ह्यात उद्याही अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. तसेच भरतीची वेळ विचारात घेऊन जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व खासगी शाळांना सुट्टी जाहीर केल्याचे शिनगारे यांनी यावेळी सांगितले. अशा परिस्थितीतही शाळा भरविल्यास काही घटना घडल्यास त्यास ते शाळा व्यवस्थापन जबाबदार असतील असेही शिनगारे यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडी यांचाही आढावा घेण्यात आला. ज्या शाळांची इमारत मोडकळीस आलेली असेल तेथील वर्ग तातडीने थांबवून सुस्थितीतील इमारतीत हलविण्यात यावेत, अशा सूचनाही शिनगारे व जिंदल यांनी यावेळी दिल्या.

नागरिकांना केले आवाहन : पावसाचा जोर ओसरेपर्यंत नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच घराबाहेर पडणे आवश्यक असल्यास योग्य ती काळजी घ्यावी. नद्यांच्या पुलावरून पाणी वाहत असताना वाहने पुलावरून नेऊ नये. तसेच कोणत्याही पर्यटनस्थळावर जाऊ नये. नागरिकांना काही मदत लागल्यास स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी जिंदल यांनी केले आहे.

हेही वाचा -

  1. Thane Flood : रुळावरून चालताना चार महिन्यांचे बाळ पडले पुराच्या पाण्यात, आईचा आक्रोश
  2. Heavy Rains In Satara : आंबेनळी, कुंभार्ली घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प; महाबळेश्वर-पाचगणी मार्गावर आले पुराचे पाणी

Last Updated : Jul 19, 2023, 10:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.