ETV Bharat / state

भिवंडी लोकसभा: कपिल पाटील दीड लाख मतांनी विजयी

भिवंडी लोकसभा मतदारसंघात कपील पाटील यांनी बाजी मारत दिल्ली गाठली आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील लढत ही अत्यंत तुल्यबळ समजली जात होती. येथून युतीकडून पुन्हा भाजपचे कपिल पाटील हे तर आघाडीकडून काँग्रेसचे सुरेश टावरे हे मैदानात उतरले होते. तर वंचित आघाडीकडून अरुण सावंत यांनी निवडणूक लढवली होती. त्यामुळे भिवंडी लोकसभेसाठी रंगत निर्माण झाली होती.

संपादित छायाचित्र
author img

By

Published : May 23, 2019, 6:06 AM IST

Updated : May 23, 2019, 8:05 PM IST

Live Updates

4.45-कपिल पाटील 84295 हजार मतांनी आघाडीवर.

1.53- कपिल पाटील 43 हजार मतांनी आघाडीवर

11.41- कपिल पाटील 19712 मतांनी आघाडीवर

11.05- काँग्रेसचे सुरेश टावरे आघाडीवर

10.22 am- कपिल पाटील सात हजार मतांनी आघाडीवर

8.00 am- प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात

ठाणे - भिवंडी लोकसभा मतदारसंघात कपील पाटील यांनी बाजी मारत दिल्ली गाठली आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील लढत ही अत्यंत तुल्यबळ समजली जात होती. येथून युतीकडून पुन्हा भाजपचे कपिल पाटील हे तर आघाडीकडून काँग्रेसचे सुरेश टावरे हे मैदानात उतरले होते. तर वंचित आघाडीकडून अरुण सावंत यांनी निवडणूक लढवली होती. त्यामुळे भिवंडी लोकसभेसाठी रंगत निर्माण झाली होती. भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी 53.07 टक्के मतदान झाले होते.

२००९ ला लोकसभेतील मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर भिवंडी हा स्वतंत्र मतदारसंघ तयार झाला. त्यावेळी काँग्रेसच्या सुरेश टावरे यांनी भाजपच्या जगन्नाथ पाटील यांचा पराभव केला होता. २०१४ साली कपिल पाटील यांनी आयत्यावेळी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करून लोकसभेची उमेदवारी मिळवली. मोदी लाटेत ते तब्बल ४ लाख ११ हजार मते मिळवत विजयी झाले होते. तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे विश्वनाथ पाटील यांना ३ लाख १ हजार ६२० मते मिळाली होती.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : May 23, 2019, 8:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.