ठाणे- शहरात कन्टेनमेंट झोन सोडून बाकी ठिकाणी दारूविक्री सुरू आहे. मात्र, ज्या ठिकाणी मद्यपींची मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती, त्या ठिकाणी दारूविक्री बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, काही वाईन शॉप मालक लपून दारूविक्री करत असल्याचे समोर आले आहे.
एका वाईनशॉप मालकाने सिडको परिसरात असलेले वाइन शॉप रात्रीच्या सुमारास दोनदा उघडून मद्य विक्री केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात एकदा चक्क पोलीसच ग्राहक असल्याचे दिसून येत आहे. तर दुसऱ्या वेळी एका नागरिकाला मद्य विक्री करण्यात आली आहे. हा प्रकार याच परिसरातील काही नागरिकांनी आपल्या मोबाइलमध्ये कैद केला आहे. या घटनेनंतर, वाइन शॉप मालकावर उत्पादन शुल्क विभाग काय कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान शॉप जवळ ५०० मीटर अंतरावर काही कोरोनाबाधित सापडल्यामुळे हा परिसर सील करण्यात आला आहे.
हेही वाचा- खाकीतील माणुसकीचे दर्शन; परराज्यात पायी जाणाऱ्यांना फुकट बस प्रवास