ETV Bharat / state

झोपड्यांवर दरड कोसळून हजारो लोकांचा जीव जाऊ शकतो - आमदार जितेंद्र आव्हाड - झोपडी

कळवा डोंगरावरील आतकोनेश्वर परिसरात रात्री 12 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास आदर्श चाळी जवळील एका घरावर डोंगराचा काही भाग कोसळला. आदर्श चाळीजवळचा भाग धोकादायक असल्यामुळे सदर ठिकाणाहून वीस कुटुंबातील एकूण सत्तर लोकांना ज्ञानगंगा शाळेमध्ये तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले आहे. तरी शासनाने या समस्येकडे लक्ष देऊन भविष्यात अशी घटना घडणार नाही, याची खबरदारी घ्यावी. अशी मागणी नगरसेविका वर्षा मोरे यांनी केली.

कळवा डोंगर
author img

By

Published : Jul 30, 2019, 2:48 PM IST

ठाणे - कळवा येथील डोंगरावर अनेक अनधिकृत झोपड्या निर्माण झाल्या असून पावसामुळे या झोपड्यांवर दरड कोसळून हजारो लोकांचा जीव जाऊ शकतो व माळीण येथे घडलेल्या घटनेपेक्षाही महाभयंकर घटना येथे घडू शकते, असा गंभीर इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

कळवा डोंगरावरील आतकोनेश्वर परिसरात रात्री 12 वाजून 20 मिनीटांच्या सुमारास आदर्श चाळी जवळील एका घरावर डोंगराचा काही भाग कोसळला. यामुळे घराची भिंत देखील कोसळली. या कोसळलेल्या मातीच्या ढिगाऱ्याखाली एकूण तीन व्यक्ती सापडल्या. यात बिरेंद्र जैस्वार व सनी जैस्वार या पिता पुत्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बीरेंद्र यांची पत्नी नीलम हिला गंभीर दुखापत झाली असून तिला उपचारासाठी कळव्याच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात भर्ती करण्यात आले आहे. सदर जागा ही वनविभागाची असून त्यावर एवढ्या झोपड्या कोणी बांधल्या याचे राजकारण आपल्याला करायचे नसून कळवा स्थानकाजवळ असलेल्या मफतलाल कंपनीच्या खासगी जागेवर या सर्वांचे तातडीने पुनर्वसन करावे, अशी मागणी स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. आदर्श चाळीजवळचा भाग धोकादायक असल्यामुळे सदर ठिकाणाहून वीस कुटुंबातील एकूण सत्तर लोकांना ज्ञानगंगा शाळेमध्ये तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले आहे.

माहिती देतांना जितेंद्र आव्हाड आणि इतर

स्थानिक नगरसेविका वर्षा मोरे व नगरसेवक महेश साळवी यांनी दुर्घटनेची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि नागरिकांना मदत केली. प्रशासनाचे लक्ष नसल्यामुळे इथे भूमाफिया अत्यंत सक्रिय असून दररोज नवीन झोपड्या बांधल्या जात आहेत. ज्यामुळे जुन्या झोपड्यांना धोका निर्माण झाला आहे. तरी येथे संरक्षण भिंत बांधावी जेणेकरून नवीन झोपड्या बांधल्या जाणार नाहीत. अशी मागणी या दोन्ही नगसेवकांनी केली. पोटा-पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी इथे राहायला येणाऱ्या लोकांना राहण्यासाठी जागा नसते, ज्याचा फायदा हे भूमाफिया घेतात व लोकांना अशा अनधिकृत झोपडीत राहण्यास भाग पडते. तरी शासनाने या समस्येकडे लक्ष देऊन भविष्यात अशी घटना घडणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी नगरसेविका वर्षा मोरे यांनी केली.

वनविभागाच्या जमिनीवर उभ्या असलेल्या या हजारो झोपड्यांमधील रहिवाशांना प्रत्येक पावसाळ्यात असेच जीव मुठीत धरून जगावे लागते. तरी शासनाने या भूमाफियांवर कडक कारवाई करून हे प्रकार थांबवावेत, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Intro:ठाण्यात माळीण पेक्षा भयंकर दुर्घटना घडणार.. जितेंद्र आव्हाड यांचा सरकारला इशारा.. दरड कोसळून पिता पुत्र ठारBody:
कळवा येथील डोंगरावर भरमसाट अनधिकृत झोपड्या झाल्या असून पावसामुळे या झोपड्यांवर दरड कोसळून हजारो जीव जाऊ शकतील व माळीण येथे घडलेल्या घटनेपेक्षा महाभयंकर घटना येथे घडू शकते असा गंभीर इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. कळवा डोंगरावरील आतकोनेश्वर परिसरात रात्री 12.20 वाजता आदर्श चाळी जवळील एका घरावर डोंगराचा काही भाग कोसळला व सदर घराची भिंत कोसळली. त्या मातीच्या ढिगाऱ्याखाली एकूण तीन व्यक्ती सापडल्या यात बिरेंद्र जैस्वार व सनी जैस्वार या पिता पुत्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बीरेंद यांची पत्नी नीलम हिला गंभीर दुखापत झाली असून तिला उपचारासाठी कळव्याच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात भर्ती करण्यात आले आहे. सदर जागा ही वनविभागाची असून त्यावर एवढ्या झोपड्या कोणी बांधल्या याचे राजकारण आपल्याला करायचे नसून कळवा स्थानकाजवळ असलेल्या मफतलाल कंपनीच्या खाजगी जागेवर या सर्वांचे तातडीने पुनर्वसन करावे अशी मागणी स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. या डोंगरांवर कोणी कश्या झोपड्या बांधल्या आणि त्याला कोणाचे आशीर्वाद लाभले आहेत हे आपल्याला चांगलेच ठाऊक आहे परंतु आपण आतातरी त्यात जाऊ इच्छित नसल्याचे त्यांनी सांगितले. आदर्श चाळीजवळचा भाग धोकादायक असल्यामुळे सदर ठिकाणाहून वीस कुटुंबातील एकूण सत्तर लोकांना ज्ञानगंगा शाळेमध्ये तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले आहे.
स्थानिक नगरसेविका वर्षा मोरे व नगरसेवक महेश साळवी यांनी दुर्घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व नागरिकांना मदत केली. प्रशासनाचे लक्ष नसल्यामुळे इथे भूमाफिया अत्यंत सक्रिय असून दररोज नवीन झोपड्या बांधल्या जात आहेत ज्यामुळे जुन्या झोपडयांना धोका निर्माण झाला आहे. तरी येथे संरक्षण भिंत बांधावी जेणेकरून नवीन झोपड्या बांधल्या जाणार नाहीत अशी मागणी या दोन्ही नागसेवकांनी केली. पोटापाण्यासाठी येणाऱ्या लोकांना राहण्यासाठी जागा नसते ज्याचा फायदा हे भूमाफिया घेतात व त्यांना अशा अनधिकृत झोपडीत राहण्यास भाग पडते. तरी शासनाने या समस्येकडे लक्ष देऊन भविष्यात अशी घटना घडणार नाही याची खबरदारी घ्यावी अशी मागणी नगरसेविका वर्षा मोरे यांनी केली.
वनविभागाच्या जमिनीवर उभ्या राहिलेल्या या हजारो झोपड्यांमधील रहिवाश्यांवर प्रत्येक पावसाळ्यात असेचं जीव मुठीत धरून राहावे लागते तरी शासनाने या भूमाफियांवर कडक कारवाई करून हे प्रकार थांबवावेत अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
BYTE - स्थानिक रहिवासी
BYTE -महेश साळवी (स्थानिक नगरसेवक
BYTE - जितेंद्र आव्हाड (स्थानिक आमदार)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.