ठाणे- गेल्या चोवीस तासात माळशेज घाटात दुसऱ्यांचा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. मोठ्या प्रमाणात दगड कोसळल्याने दोन्हीकडील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. प्रशासनाच्या मते पुढील सूचना मिळेपर्यंत वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आल्याचेही सांगण्यात आले. तर काही वेळापूर्वीच मदत कार्य घटनास्थळी पोहोचल्याची माहितीही देण्यात आली आहे.
दरम्यान, माळशेज घाटात दरवर्षी पावसाळ्यात लहान-मोठ्या दरडी कोसळून अनेक जण जखमी झालेत तर काहींचे जीवही गेले. मात्र, प्रशासन या घाटावर दुरुस्तीच्या नावाखाली दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च करते. तर दरडी कोसळू नयेत म्हणून यावरही दरवर्षीही उपाय योजना राबवल्या गेल्या. मात्र, आज कोसळलेल्या दरडीमुळे याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन यावर ठोस उपाय योजना करावी, अशी मागणी आता पुढे आली आहे.