ठाणे Kunbi Sena Chief Warns Government : मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र राज्य सरकारने दिल्यास त्याला कुणबी सेनेचा विरोध आहे. जर सरकारने हा निर्णय घेतला, तर राज्यभरात कुणबी सेना राज्य सरकार विरोधात अंदोलन करणार (agitations will be done). याप्रकारचा इशारा कुणबी सेनेचे राज्य प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना सरकारला इशारा दिला आहे.
जालना घटनेचा निषेध - गेल्या २३ वर्षापासून कुणबी सेना ही राज्यातील कुणबी समाजाला ओबीसीमधून स्वतंत्र आरक्षणाची मागणी करीत आहे व ओबीसीचे संरक्षण व्हावे या मागणीसाठी अनेक वर्षापासून तेही आग्रही आहेत. परंतु २ दिवसापूर्वी जालना येथील मराठा समाजावर लाठीचार्ज झाला ही दुर्दवी घटना असून त्याचा निषेध कुणबी सेना करीत असल्याचे सांगण्यात आले.
मुख्यमंत्र्यांना कुणबी समाजाचे पत्र - मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याबाबत कुणबी आणि ओबीसी समाजाचा कोणत्याही प्रकारचा आक्षेप नसल्याचा खुलासा कुणबी सेनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रात केला आहे. शिवाय कुणबी जातीचे मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्यात येऊ नये (Kunbi Caste Certificate). मराठा समाज हा महाराष्ट्रातील प्रगत समाज असून आत्तापर्यंत सुमारे ९५% मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे होऊन गेले आहेत. कुणबी जातीला मराठा समाज तुच्छ लेखत असून रोटी-बेटी व्यवहाराला मराठ्यांचा पूर्वीपासून विरोध आहे. असंही मुख्यमंत्री शिंदेंना कुणबी सेनेचे राज्य सरचिटणीस डॉ. विवेक पाटील यांनी दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांसह सरकारला इशारा - एकंदरीत जर का राज्य सरकराने मराठा समाजाला कुणबी जातीची प्रमाणपत्रे देण्याचा निर्णय घेतल्यास कुणबी सेना व कुणबी समाज तसंच ओबीसी समाजाच्यावतीनं राज्यभर तीव्र आंदोलने करण्यात येणार असल्याचा इशारा मुख्यमंत्र्याना पत्राव्दारे दिला असल्याची माहिती कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी दिली आहे.
दोन दिवसापांसून मराठा समाजाच्या वतीने राज्यभर हिंसक आंदोलने तर काही ठिकाणी बंद पुकारून राज्य सरकारविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. त्यातच कुणबी सेनेच्या वतीने दिलेल्या इशाऱ्यानंतर जर राज्य सरकाराने निर्णय घेतला. तर कुणबी समाज विरुद्ध राज्य सरकार अशी रस्त्यावरील लढाई पाहावयास मिळणार आहे.
हेही वाचा...
- Maratha Reservation Protest: लाठीचार्जचा आदेश दिल्याचं सिद्ध करा, अन्यथा राजकारण सोडा-अजित पवारांचे विरोधकांना आव्हान
- Maratha Protest : मराठा आरक्षणासाठी समाज रस्त्यावर, संभाजीनगरमध्ये युवकाचा पेटवून घेण्याचा प्रयत्न
- Sanjay Raut : मराठा आरक्षणासाठी घटनादुरुस्ती करता येत नाही का? संजय राऊतांचा सरकारला सवाल