ठाणे: पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १५ दिवसांपूर्वी शनिवारी रात्री १० वाजता तक्रारदार महिला बेबी आणि तिचा आजारी पती घरात एकटे होते. दरम्यान पाच अज्ञात व्यक्ती हातात कोयते घेऊन त्यांच्या घरात शिरले आणि त्यांच्या मुलाला ठार मारण्याची धमकी देत दारावर लाथाबुक्क्या मारल्या. यामध्ये गुंड जितू निशाद सह त्याच्या साथीदारांचा समावेश होता. मुलगा घरात नाही असे बेबी त्यांना खिडकीतून सांगत होत्या; मात्र जितूने महिलेला दार उघडण्यास भाग पाडले. अन्यथा दार तोडून घरात घुसू, अशी धमकीसुद्धा दिली.
शेजाऱ्यांनाही धमकावले: फिर्यादी बेबीने दार उघडताच जितूने त्यांना कोयता दाखवत मारहाण सुरू केली. बेबीने बचावासाठी ओरडा-ओरड केली असता शेजारची मंडळी मदतीसाठी धावली; परंतु जितूने त्यांनाही कोयत्याने ठार मारण्याची धमकी देत हुसकावून लावले. यानंतर कोयता गॅंग हातात कोयते घेऊन रस्त्यावर नाचू लागली. हे बघून परिसरातील रहिवाशांनी भीतीने घराची दारे बंद केली. परिणामी फिर्यादीच्या बचावासाठी कोणीही पुढे आले नाही.
दारावर कोयत्याचे वार, गुंड पसार: यानंतर कोयता गॅंग बेबी यांच्या घराच्या दारावर कोयत्याचे वार करत पसार झाली होती. आता १५ दिवसांनी या त्यांच्या दहशतीचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे; मात्र मानपाडा पोलिसांना गुंड जितू निशाद याच्यासह इतर ५ गुंडांना पकडण्यात यश आलेले नाही. या घटनेने डोंबिवली परिसरात भीतीचे वातावरण आहे.
पुण्यातही कोयता गॅंगची दहशत: पुणे शहरातील भवानी पेठेतील तुमची हिंदुची हॉटेल चालवण्याची औकात आहे का? असे म्हणत कोयता गँगकडून हॉटेल निशा रेस्टॉरेन्टची 5 ते 6 जणांकडून तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी लष्कर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे.
कोयता गॅंगची दहशत संपेल का? तक्रारदार मोनिष म्हेत्रे सांगितले की, दुपारी साडे तीनच्या सुमारास हॉटेलमध्ये गर्दी कमी असल्याने माझ्या हॉटेल मध्ये कामगार संतोष, आझीम हे हॉटेलमध्ये ग्राहक पाहत होतो. मी हॉटेल समोर पार्किंगच्या ठिकाणी बसलो होतो. त्यावेळी टू व्हीलर गाडीवरून पाच ते सहा मुले आली त्यांनी तोंडाला रुमाल व डोक्यात टोपी घातलेली होती. त्याचे हातात लोखंडी कोयता, हॉकी व रॉड होते. ते आमचे हॉटेलमध्ये गेले त्यावेळी मी काउंटर दिसलो नाही. म्हणुन ते परत बाहेर आले व मला पाहून त्यातील तीघेजण माझ्या अंगावर पार्किंग मध्ये धावुन आले व त्यानी मला शिवीगाळ करून मला म्हणाले की " तुमची हिंदुची हॉटेल चालवण्याची औकात आहे का? असे म्हणाले. त्याचे वय अंदाजे 25 ते 26 अंगाने सडपातळ अंगात जीन्स पेन्ट तोडावर रुमाल बांधलेले होते व हॉटेलच्या आतमध्ये दोन ते तीन जणांनी तोडफोड करून नुकसान केली. व सर्वजण तिथुन निघुन जाताना माझ्याकडे रागाने मला पाहुन शिवीगाळ करुन निघुन गेले, असे तक्रारदार मोनिष म्हेत्रे यांनी तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान घटनेचा तपास पोलिस करत आहे.
हेही वाचा: Kozikode Crime News : वैयक्तिक वैमनस्यातून केला भावाच्या मुलाचा खून! महिलेला अटक