ETV Bharat / state

प्रियकरावरुन दोन तरुणींमध्ये घमासान, एकीचा दुसरीवर चाकुने वार

या दोन्ही मुली एका केक शॉपमध्ये काम करतात. दोघींचा प्रियकर एकच असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे दोघीत वाद झाला.

पोलीस ठाणे
author img

By

Published : Feb 24, 2019, 12:06 AM IST

ठाणे - एका मुलीने दुसरीवर चाकू हल्ला करुन जखमी केल्याची घटना उल्हासनगर शहरात घडली आहे. या दोघींचा प्रियकर एकच मुलगा असल्याने या दोघीत वाद झाला. या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. यातच एकीने दुसरीवर चाकू हल्ला केला. हल्ला करणाऱ्या मुलीचे नाव बिंदू असून, जखमी मुलीचे नाव काजल आहे. या दोघीही एका केक शॉपमध्ये काम करतात.

उल्हासनगर शहरातील कॅम्प नं. ५ येथील नेताजी चौक परिसरात केक शॉप नावाचे दुकान आहे. त्या दुकानात काजल आणि बिंदू या दोन मुली कामाला आहेत. त्या दोघी शिक्षण घेत काम करतात. या दोघींचा प्रियकर एकच मुलगा आहे, असे दोघींच्या लक्षात आले. त्यावरुन दोघीत वाद झाला. बिंदूने काजलला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याचे पर्यवसन हाणामारीत झाले.

या हाणामारीत बिंदुने केक कापण्याच्या सुरीने काजलवर वार केला. यात तिच्या डोक्याला जखम झाली आहे. त्यानंतर काजलला मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बिंदुवर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सहय्यक पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत.

प्रियकराच्या वादातून एकीने केला दुसऱ्या प्रेयसीवर चाकूने हल्ला

ठाणे : प्रियकराच्या वादातून दोघीमध्ये आदि वाद झाला. याच वादातून दोघीमध्ये झटापटी होवून एका प्रेयसीने दुसऱ्या प्रेयसीवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हि घटना उल्हासनगर शहरातील कॅम्प नं. ५ येथील नेताजी चौक परिसरात एका दुकानात घडली आहे. काजल असे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या नाव आहे. तर बिंदू असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणीचे नाव आहे.

पोलीस सूत्रांने दिलेल्या माहितीनूसार उल्हासनगर शहरातील कॅम्प नं. ५ येथील नेताजी चौक परिसरात केक शॉप नावाचे दुकान आहे. त्या दुकानात कु. काजल हि शिक्षण करून दुकानात काम करते. त्याच दुकानात काम करणारी बिंदु या तरूणीने तिला शिवीगाळ केली. तसेच दोघीचा प्रियकर एकच असल्याचे समजल्यावर आणखीनच त्यांच्यात झटापटी झाली. या झटापटीत बिंदु हिने केक कापण्याच्या सुरीने काजल हिच्यावर वार करण्यासाठी गेली असता त्या झटापटीत काजल हिच्या डोक्यावर वार होऊन तिला जखमी करण्यास ती कारणीभूत झाली.

याप्रकरणी बिंदू हिच्याविरूध्द हिललाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जखमी काजल हिच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार करून तिला घरी सोडण्यात आले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.

I’m protected online with Avast Free Antivirus. Get it here — it’s free forever.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.