पतंगांचे भाव वाढले : प्लास्टिकच्या आता मिळणाऱ्या पतंग तेव्हा नव्हत्या. पूर्वी फक्त कागदाचे पतंग ते ही हाताने बनवले जात असल्याने ते काही प्रमाणात स्वस्त देखील मिळत होते. परंतु आता प्लास्टिकचे पतंग बाजारात येऊ लागल्याने त्यांची किंमत वाढली असल्याचे पतंगविक्रेते सांगतात. पूर्वी चार आणे अथवा आठ आण्यांना मिळणारा पतंग घेण्यासाठी मुले धावत पळत दुकानावर येत असत व मोठ्या प्रमाणात पतंग विकत घेत असत परंतु पतंगा ऐवजी त्याचे भावच गगनाला भिडल्याने मुलांमध्ये उत्साह कमी झाल्याचे व्यथा त्यांनी मांडली.
ठाण्यातील पतंगवाले चाचा : ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेमध्ये पतंगवाले चाचा म्हणून ओळखले जाणारे हे वर्षभर फक्त पतंग आणि मांजा याचाच व्यवसाय करतात. यावरच त्यांचे घर चालते चाळीस वर्षांपासून हा व्यवसाय करत असताना अनेक अडचणींना ते सामोरे गेलेले आहेत. महागाई व कोरोनाचे सावट या सर्व बाबी आल्यानंतरही त्यांनी व्यवसायामध्ये कोणताही बदल केला नाही. पतंग व्यवसायापेक्षा इतर कोणताही व्यवसाय आपल्याला खूप फायदेशीर ठरू शकतो, असा सल्ला चाचाच्या मित्रांनी अनेकदा त्यांना दिला. मात्र या व्यवसायावरती प्रेम करणारे चाचा इतर कोणत्याही व्यवसायाकडे दुर्लक्ष करतात आणि म्हणूनच हे चाचा वर्षभर पतंग आणि मांजा विक्री करूनच आनंद मिळवतात.
पतंग व्यवसाय संकटात? : पतंगवाले चाचा सांगतात की, पूर्वीच्या हंगामांमध्ये दहा लाखांपर्यंतचे पतंग विकले जात होते. परंतु आता हा आकडा दोन लाखांवर आल्याने पतंग व्यवसाय मोठ्या संकटात सापडला आहे. तसेच ते म्हणाले की, मुझे ज्यादा पैसा कमाना नही है लोगो की खुशी व मेरी खुशी, असे ते सांगतात. मुळात मुस्लिम समाजामधले असलेले हे चाचा हिंदू सणांसाठी करत असलेला हा प्रयत्न हा जरूर वाखाण्याजोगा आहे, कारण या व्यवसायाकडे अनेकांनी पाठ फिरवली असली तरी हे चाचा आजही अभिमानाने हा व्यवसाय करत आहेत आणि हिंदू सणांच्या बाबतीत असलेल्या त्यांचा प्रेम हे त्यांच्या व्यवसायावरून दिसत आहे. दरम्यान, पतंगाचे भाव जरी गगनाला भिडले असले तरीही पतंग उडवणे आपली परंपरा असल्याने संक्रांती दिवशी पतंग उडवणारच, असे मनोगत एका पतंग प्रेमी ने व्यक्त केले.
हेही वाचा : Youth Throat Slit By Nylon Manja : स्पर्धा परीक्षेचा पेपर देऊन जात असलेला युवकाचा नायलॉन मांजामुळे गळा चिरला