ETV Bharat / state

'कोरोना रुग्ण महिलेच्या मृत्यूस राज्य सरकार व रुग्णालय प्रशासन जबाबदार'

भिवंडीतील आयजीएम कोव्हिड रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा वेळेत न झाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या महिलेच्या मृत्यूस फेसबूकवर बडबड करणारे उद्धव ठाकरे सरकार, आणि रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला.

bhiwandi
किरीट सोमय्या यांनी दिली आयजीएम रुग्णालयास भेट
author img

By

Published : Jun 3, 2020, 9:37 PM IST

ठाणे - भिवंडीतील आयजीएम कोव्हिड रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा वेळेत न झाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या महिलेच्या मृत्यूस फेसबूकवर बडबड करणारे उद्धव ठाकरे सरकार आणि रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. सोमय्या यांनी भिवंडीतील आयजीएम रुग्णालयास भेटी दिली त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

भिवंडी शहरात मागील आठवड्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाच मृत्यूची संख्या 11 वर पोहोचली आहे. दोन दिवसांपूर्वी महिलेला इंदिरा गांधी स्मृती कोव्हिड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्या महिलेस ऑक्सीजनचा वेळेवर पुरवठा होऊ न शकल्याने तिचा मृत्यू झाल्याने येथील रुग्णालयातील व्यवस्था तकलादू असल्याचे सिद्ध होत असल्याचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. सोमय्या यांनी रुग्णालयास भेट देत या महिलेचा मृत्यू ही हत्या असून, त्यास उद्धव ठाकरे सरकार व रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. शंभर दिवस झाले परंतू, उद्धव ठाकरे सरकार रुग्णलयांच्या स्थितीत सुधारणा घडवून आणू शकत नाही. त्यामुळे हे सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

भिवंडी शहरातील गोपाळनगर परिससरात राहणाऱ्या पती-पत्नी यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना आयजीएम कोव्हिड रुगणालायत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या दरम्यान 55 वर्षीय महिलेचा 31 मे रोजी अंत झाला. परंतू, महिलेस ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांकडून सुरू झाल्याने या घटनेची सत्यता जाणून घेण्यासाठी सोमय्या यांनी आयजीएम हॉस्पिटल व मनपा मुख्यालयास भेट दिली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिल थोरात व आयुक्त. डॉ प्रवीण आष्टीकर यांच्याशी विस्तृत चर्चा केली. या चर्चेदरम्यान रुग्णालयात 20 व्हेंटिलेटरची गरज असून, सध्या फक्त 4 उपलब्ध असल्याची महिती डॉ. अनिल थोरात यांनी दिली. शासन बिकेसी येथे अद्यावत रुग्णालय उभारते, ते बंदही करते. परंतू, भिवंडी शहरातील रुग्णलयाच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष करत असल्याबद्दल सोमय्या यांनी खेद व्यक्त केला. मुख्यमंत्री फक्त फेसबूकवर लाईव्ह दिसतात. परंतू, शंभर दिवसात ते कोरोनाचा मुकाबला करण्यात अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. याप्रसंगी त्यांच्यासोबत भाजप शहराध्यक्ष संतोष शेट्टी, आमदार महेश चौघुले, शाम अग्रवाल, प्रा. डॉ. सुवर्ण रावळ, विनोद भानुशाली आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.