ठाणे : झाडावरील खारूताईला प्राणी मित्राचा लळा लागल्याची घटना कल्याण पश्चिम भागात समोर आली आहे. पेशाने सर्पमित्र - प्राणी मित्र असणारे दत्ता बोबे यांनी आवाज देताच झाडावरील एक खारूताई त्यांच्या जवळ येऊन अंगावर बागळत असते, एव्हरी मनुष्याची भीती बाळगणाऱ्या या खारूताईला दत्ता त्यांच्या हाताने घास भरवत असल्याने या दोघांमधील एक अनोखी मैत्री पाहण्यास मिळत आहे.
खारूताईसाठी उभारला जाड दोर बांधून पूल - एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर तुरूतुरू धावणारी, सरसर झाडावर चढणारी खारूताई सर्वांना अगदी लहानपणाच्या दिवसांपासून परिचयाची आहे. या भित्र्या आणि लाजाळू त्या खारूताईचं विश्व जाणू प्राणी मित्राचे घर व आसपास असलेले झाड बनले आहे. प्राणी मित्र दत्ता सांगतात कि, निरूपदवी आणि घाबरट स्वरूपाच्या खारूताई अर्थात खार हा प्राणी आहे. पण तिचे दात कमालीचे तीक्ष्ण असतात. पळण्याचा वेग तिच्या जीवाच्या तुलनेने खूप असतो. प्रोटीन्स, काबोर्हायड्रेट्स व फॅट्सयुक्त झाडावरील फळं, कीटक, पालेभाज्या, नव्याने फुटलेले कोंब, झाडाची साल हे त्यांचं प्रमुख खाद्य आहे. याशिवाय फुलातला मधाळ रसही त्यांच्या आवडीचा असल्याने दत्ता यांनी त्यांच्या घरातील गॉलरीमध्ये खास खारूताईसाठी विविध फुलांचे झाडे लावली. शिवाय तिला गॉलरीत येता यावे, म्हणून झाड आणि गॉलरीमध्ये तिच्यासाठी जाड दोर बांधून पूलही उभारला आहे.
संरक्षण व संवर्धनासाठी प्रयत्न - गेल्यातीन महिन्यापासून नित्य नियमाने रोज त्यांच्या गॉलरीत येऊन बागळत असल्याची माहिती दत्ता यांनी दिली आहे. तसेच अशा या दुर्मिळ होत चाललेल्या खारूताईच्या संरक्षण व संवर्धनासाठी आपला छोटासा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. तर इतरांनीही खारूताई या प्राण्याविषयी संरक्षण व संवर्धनासाठी प्रयत्न करावे असे आव्हान त्यांनी नागरिकांना केले आहे.
हेही वाचा : Factory building collapsed : भिवंडीत कारखान्याची धोकादायक इमारत कोसळून ४ चार जखमी