ETV Bharat / state

रेशनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 200 पोती तांदूळ जप्त

author img

By

Published : Nov 16, 2019, 11:22 AM IST

खडकपाडा पोलिसांनी स्वस्त धान्य दुकानासाठी असलेल्या तांदळाचा काळा बाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे.

जप्त केलेला ट्रक

ठाणे - स्वस्त धान्य दुकानासाठी असलेल्या तांदळाचा काळा बाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला. खडकपाडा पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी मनसुख निजाम या ट्रक चालकाला अटक केली असून ट्रकमधील २०० पोती तांदूळ ताब्यात घेतला आहे. मनसुखच्या पाच फरार साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

शासकीय गोडाऊनमधून स्वस्त धान्य दुकानासाठी धान्य घेऊन निघालेला ट्रक हे धान्य बाजारात विकण्यासाठी येत आहे, अशी माहिती खडकपाडा पोलिसांना मिळाली. कल्याणकडून नगरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकची पोलिसांनी तपासणी केली. ट्रक चालकाने दाखवलेल्या कागदपत्रांबाबत संशय आल्याने त्यांनी रेशनिंग अधिकाऱ्यांना पाचारण केले.

हेही वाचा - 'संजय राऊत म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील हिरा'

संबधित अधिकाऱ्यांनी शहानिशा केली असता, ही कागदपत्रे बनावट वापरून ट्रकमधील 200 गोणी तांदूळ बाजारात नेत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्काळ ट्रक चालक मनसुख निजामला अटक केली.

Intro:kit 319Body:रेशनिंगचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 200 गोण्या तांदूळ जप्त, १ अटकेत 5 फरार

ठाणे : रेशनिगच्या तांदळाचा काळा बाजार करणाऱ्या टोळीचा खडकपाडा पोलिसांच्या सतर्कतेमुळे पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी ट्रक अडवून कागदपत्र तपासले असता संशय आला. यामुळे पोलिसांनी रेशनिग अधिकाऱ्यांना पाचारण करून कागदपत्रांची पड्ताडणी केली असता ते बनावट कागदपत्र बनवून ट्रक मधील 200 गोणी तांदूळ काळा बाजारासाठी नेला जात असल्याचे उघड झाले.
या प्रकरणी पोलिसांनी मनसुख निजाम या ट्रक चालकाला अटक करत त्याचा ट्रक व ट्रकमधील 200 गोणी तांदूळ जप्त केले.तर मनसुखचे पाच साथीदार पसार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत.

शासकीय गोडाऊनमधून रेशनिंग दुकानासाठी धान्य घेऊन निघालेला ट्रक हे धान्य खुल्या बाजारात विकण्यासाठी घेऊन जाण्याच्या तयारीतअसून सायंकाळच्या सुमारास तो कल्याणहुन नगरच्या दिशेने जाणार असल्याची माहिती खकडपाडा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात हा ट्रक दिसताच अडवत तपासणी केली यावेळी ट्रक चालकाने दाखवलेल्या कागदपत्राबाबत संशय आल्याने त्यांनी रेशनिंग अधिकाऱ्यांना पाचारण केले. रेशनिग अधिकाऱ्यांनी शहानिशा केली असता हे कागदपत्रे बनावट असून ट्रकमधील 200 किलो तांदूळ काळा बाजारात नेणार असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्काळ ट्रक चालक मनसुख निजामला अटक करत त्याचा ट्रक व ट्रक मधील 200 गोणी तांदूळ जप्त करत पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणी मनसुखचे पाच साथीदार पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Conclusion:reshan
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.