ETV Bharat / state

Kapil Patil Vs Kisan Kathore : कपिल पाटील-किसन कथोरे यांच्यात कुरघोडीचं राजकारण; भाजपाची वाढली डोकेदुखी

Kapil Patil Vs Kisan Kathore ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या काही वर्षात मोठी ताकद उभी करणाऱ्या भाजपामध्ये सध्या केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील आणि मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्यात कुरघोडीच्या राजकारण सुरू आहे. त्यामुळे आगामी सर्वच निवडणुकीत भाजपाची डोकेदुखी वाढणार आहेत. राजकीय कुरघोडी करण्यासाठी दोघेही नेते कायमच एकमेकांवर राजकीय चिखलफेक करण्यात माहीर असल्याचा प्रकार समोर आला आहे.

Kapil Patil Vs Kisan Kathore
Kapil Patil Vs Kisan Kathore
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 7, 2023, 7:47 PM IST

Updated : Sep 8, 2023, 6:26 AM IST

कपिल पाटील-किसन कथोरे यांच्या प्रतिक्रिया

ठाणे Kapil Patil Vs Kisan Kathore : गेल्याच आठवड्यात मुंबई नाशिक महामार्गावरील एका आलिशान हॉटेलमध्ये केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी भाजपामधील कुणबी समाजाच्या कार्यकर्त्यांची बैठकीचे आयोजन केले होते. त्या बैठकीत काही भाजप कार्यकर्त्यांनी आमदार कथोरे यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून आमदार कथोरे यांनी शहापूर तालुक्यातील डोळखांब येथे घेतलेल्या जाहीर सभेत धमकी दिल्याचे वक्तव्य केले. ‘मी कुणाच्या धमक्यांना घाबरत नाही,. ‘तुम्ही कोंबडा कापायला तीन वेळ विचार करता. माणसे कापणारी लोक माझ्या इथे सभेत सोबत असल्याची कबुली त्यांनी जाहीर सभेत दिली. त्यानंतर भाजपाच्या दुसऱ्या गटात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून त्यालाच प्रत्युत्तर म्हणून केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनीही कोणाच्याही असण्याने नसण्याने काहीही फरक पडत नाही असे प्रसारमाध्यमाना कथोरे वादावर पाटील यांनी कालच प्रतिक्रिया दिली.

कोणाला फरक पडत नाही- केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले, भारतीय जनता पक्ष हा पक्ष म्हणून काम करतो. कपिल पाटील यांच्या पाठीमागून भाजपा वजा केली तर कपिल पाटील यांची किंमत शून्य आहे. कोणाही काहीही केल्यानं कोणाला फरक पडत नाही. जो विकास केला आहे, त्या विकासाच्या बळावर भाजपा उमेदवाराला मते मिळतील. त्यामुळे लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामसभेत कुठेही कोणाच्या असण्यानं व नसण्यानं काहीही फरक पडत नाही. ते 2014 ला कुठे होते? तेव्हाही भाजपा पक्षाचाच विजय झालेला आहे, असे सांगत कपिल पाटील यांनी किसन कथोरे यांचे नाव न घेता टीका टोमणा मारला

भाजपासाठी आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे- लोटस मिशन राबवून राज्यात लोकसभेच्या अधिकाधिक जागा मिळविण्यासाठी भाजपाच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. यासाठी बेरजेची गणिते विविध पातळ्यांवर सुरू आहेत. विशेष म्हणजे एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा भिवंडी लोकसभा मतदारसंघातील काही विधानसभा क्षेत्रातही भाजपाने बस्तान बसविले आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच भाजपाचे ग्रामीण अध्यक्ष म्हणून कपिल पाटील समर्थक मधुकर मोहपे यांची निवड करण्यात आली. तेव्हापासून या दोन नेत्यांच्या वादाचे कारण ठरू लागले आहे. मंत्री पाटील यांचे समर्थन लाभलेल्या मोहपे यांना जिल्हा अध्यक्षपदावरून हटवावे यासाठी आमदार कथोरे समर्थकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू केले. एरवी सुरक्षित वाटणारा भिवंडी लोकसभा मतदारसंघ भाजपासाठी आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

भाजपा पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता- केंद्रीय राज्यमंत्री पाटील यांच्यापेक्षा ज्येष्ठ असलेले मुरबाड मतदारसंघाचे भाजपाचे आमदार किसन कथोरे यांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सध्या राज्यमंत्री पाटील सोडत नाहीत. ग्रामीणचे भाजप अध्यक्ष मधुकर मोहपे यांच्या कार्यपद्धतीवरुन सध्या पाटील आणि कथोरे यांच्यात जाहीर वाद सुरु असून मोहपे यांना हटवा या मागणीसाठी कथोरे समर्थकांनी थेट भाजप प्रदेशाध्यक्षांकडे ८०० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे ग्रामीणच्या गडातील विसंवादाचे हे वारे भाजपासाठी धोक्याची घंटा ठरली आहे. दुसरीकडे मुरबाडचे आमदार कथोरे यांना सातत्याने नाराज करत मंत्री पाटील यांनी ठाणे जिल्ह्यातील भाजपामध्येच वजाबाकीचे राजकारण सुरु केल्याच्या तक्रारी कथोरे समर्थकांनी श्रेष्ठींकडे केल्या आहेत. तर मंत्री पाटील यांच्या आक्रमक राजकीय खेळीने भाजपाच्या ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

Last Updated : Sep 8, 2023, 6:26 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.