ETV Bharat / state

साम्राज्य अबाधित राखण्यासाठी कलानी कुटुंबाची धडपड; ज्योती कलानीचा राजीनामा - विधानसभा निवडणूक2019

उल्हासनगरात कलानीचे साम्राज्य अबाधित राखण्यासाठी कुटुंबाची धडपड पाहावयास मिळाली आहे. तर दुसरीकडे आपण आमदार पदाचा व राष्ट्रवादी जिल्हा पदाचा राजीनामा वैयक्तिक अडचणीमुळे  देत असल्याचे आमदार ज्योती कलानी यांनी सांगितले. भाजप जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी हे माजी आमदार आहेत.

ज्योती कलानी
author img

By

Published : Sep 27, 2019, 8:32 PM IST

ठाणे- आमदार ज्योती कलानी यांनी सुनेला भाजपाची उमेदवारी मिळावी म्हणून तडकाफडकी आमदार पदाचा राजीनामा राष्ट्रवादीच्या प्रदेश अध्यक्षांना दिल्याचे बोलले जात आहे. त्या उल्हासनगर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आहेत. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी महापौर पंचम कलानी, ओमी कलानी, स्थायी समिती सभापती राजेश वधारिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर महापौर पंचम कलानी यांनाच भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा कलानी गोटातून येत आहे. मात्र, अद्यापही अधिकृत अशी घोषणा भाजपच्या कोणत्याही बड्या नेत्याने केली नाही.

हेही वाचा- 'फरार आर्थिक गुन्हेगार' म्हणून जाहीर करण्याच्या ईडीच्या याचिकेला नीरव मोदीचा विरोध

उल्हासनगरात कलनीचे साम्राज्य अबाधित राखण्यासाठी कुटुंबाची धडपड पाहावयास मिळाली आहे. तर दुसरीकडे आपण आमदार पदाचा व राष्ट्रवादी जिल्हा पदाचा राजीनामा वैयक्तिक अडचणीमुळे देत असल्याचे आमदार ज्योती कलानी यांनी सांगितले. भाजप जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी हे माजी आमदार आहेत. त्यांनी 2009 मध्ये कुख्यात पप्पू कलानी यांचा पराभव केला होता. 2014 मध्ये शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढल्यामुळे अवघ्या 1 हजार 800 मतांनी कुमार आयलानी यांचा आमदार ज्योती कलानी यांनी पराभव केला होता. मात्र, त्यानंतर ही कुमार यांनी त्यांचे काम नेटाने सुरू ठेवत कलानी यांना शह दिला होता. यंदा मात्र हा विधानसभा मतदारसंघ शिवसेना की, भाजपच्या गोटात जातो. हे महत्वाचे ठरणार आहे. ज्योती कलानी त्यांच्या ऐवजी कलानी कुटूंबाची सून महापौर पंचम कलानी ह्या विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे. मात्र, पंचम यांना भाजपने तिकीट नाकारल्यास त्या कोणत्या पक्षाच्या निशाणीवर लढतात. याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

पंचमचे पती ओमी कलानी यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्यांना अद्यापही भाजपमध्ये प्रवेश दिलेला नाही. त्यामुळे भाजपकडून ओमी कलानीला तिकीट भेटण्याची धूसर शक्यता आहे. युतीमध्ये विधानसभा जागा वाटप पूर्ण झाले. मात्र, या जागा वाटपात पाच जागांचा तिढा सुटत नसून उल्हासनगर त्यापैकी एक असल्याचे समजते. उल्हासनगर मध्ये भाजपचा आमदार नसल्याने ही जागा शिवसेना आपल्या वाट्याला मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहे. तर शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी हे स्वतः इच्छुक असून त्यांनी मुलाखत ही दिली आहे. मात्र, शिवसेनेला ही जागा मिळाल्यास कलानी परिवाराला सेनेची उमेदवारी मिळावी, यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात उल्हासनगरचा बडा व्यापारी नेता आहे.

उल्हासनगरमध्ये झालेल्या मराठी सिंधी दंगली, शिवसेना शाखाप्रमुख रमाकांत चव्हाण हत्या प्रकरण, बाळू सूर्यवंशी हत्या प्रकरण, मारुती जाधव हत्या प्रकरणात कलानी परिवाराचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असल्याने कलानी कुटूंबाला उमेदवारी दिल्यास शिवसेनेचा पारंपरिक मराठी मतदार नाराज होण्याची दाट शक्यता आहे. ही बाब बुधवारी रात्री शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, युवासेना अधिकारी बाळा श्रीखंडे आदींनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन कानावर टाकली. तसेच कलानी परिवाराला प्रवेश देऊन राष्ट्रवादी काँग्रेस प्रमाणे शिवसेना ही कलानी परिवार संपवेल, अशी भीती उल्हासनगरच्या शिवसैनिकांना आहे. त्यामुळे ओमी कलानी यांना पक्षात प्रवेश नाकारण्यात यावा तसेच उमेदवारी निष्ठावंत शिवसैनिकाला देण्यात यावे, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, युवासेना अधिकारी बाळा श्रीखंडे, नगरसेवक कलवंतसिंग सोहता, स्वप्निल बागुल, संघटक सागर उटवाल, विभाग प्रमुख शिवाजी जावळे, मनोहर बेहनवाल, महेंद्र पाटिल यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मागील महापालिका निवडणुकीच्या प्रचार दरम्यान भाजपवर तोंड सुख घेताना कुख्यात गुंड पप्पू कलानी बरोबर फोटो लावून घेण्यास इच्छुक नसल्याचे विधान केले होते. कलानी परिवाराला शिवसेनेने नेहमीच निकराची झुंज दिली आहे. कलानीच्या शहरातील एक कलमी अंमल हा शिवसेनेमुळे खालसा झाला आहे. त्यामुळे कलानी परिवाराला उमेदवारी देऊन शिवसेना आपलाच गड खालसा करते की, भाजपमधून कलानी कुटूंब उमेदवारी मिळवून उल्हासनगरात कलनीचे साम्राज्य अबाधित राखण्यास यश मिळविते ? याकडे सर्वच राजकीय पक्षाचे लक्ष लागले आहे.

Intro:kit 319Body: साम्राज्य अबाधित राखण्यासाठी कलानी कुटुंबाची धडपड; ज्योती कलानीचा राजीनामा

ठाणे : उल्हासनगर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार ज्योती कलानी यांनी सुनेला भाजपाची उमेदवारी मिळावी म्हणून राष्ट्रवादीचा तडकाफडकी आमदार पदाचा राजीनामा राष्ट्रवादीच्या प्रदेश अध्यक्ष यांना पाठवल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी महापौर पंचम कलानी, ओमी कलानी, स्थायी समिती सभापती राजेश वधारिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर महापौर पंचम कलानी यांनाच भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा कलानी गोटातून येत आहे. मात्र अद्यापही अधिकृत अशी घोषणा भाजपच्या कोणत्याही बड्या नेत्याने केली नाही. त्यामुळे उल्हासनगरात कलनीचे साम्राज्य अबाधित राखण्यासाठी कुटुंबाची धडपड पाहावयास मिळाली आहे. तर दुसरीकडे आपण आमदार पदाचा व राष्ट्रवादी जिल्हा पदाचा राजीनामा वैयक्तिक अडचणीमुळे राजीनामा देत असल्याचे आमदार ज्योती कलानी यांनी सांगितले.
भाजप जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी हे माजी आमदार आहेत, त्यांनी 2009 मध्ये कुख्यात पप्पू कलानी यांचा पराभव केला होता. 2014 मध्ये शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढल्यामुळे अवघ्या 1800 मतांनी कुमार आयलानी यांचा आमदार ज्योती कलानी यांनी पराभव केला होता. मात्र त्यानंतर ही कुमार यांनी त्यांचे काम नेटाने सुरू ठेवत कलानी याना शह दिला होता. यंदा मात्र हा विधानसभा मतदारसंघ शिवसेना कि, भाजपच्या कोट्यात जातो. हे महत्वाचे ठरणार आहे. ज्योती कलानी त्यांच्या ऐवजी कलानी कुटूंबाची सून महापौर पंचम कलानी ह्या विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे. मात्र पंचम याना भाजपने तिकीट नाकारल्यास त्या कोणत्या पक्षाच्या निशाणीवर लढतात, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
पंचमचे पती ओमी कलानी यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्यांना अद्याप ही भाजप मध्ये प्रवेश दिलेला नाही. त्यामुळे भाजप कडून ओमी कलानीला तिकीट भेटण्याची धूसर शक्यता आहे. युतीमध्ये विधानसभा जागा वाटप पूर्ण झाले. मात्र या जागा वाटपात पाच जागांचा तिढा सुटत नसून उल्हासनगर त्यापैकी एक असल्याचे समजते. उल्हासनगर मध्ये भाजपचा आमदार नसल्याने ही जागा शिवसेना आपल्या वाट्याला मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहे. तर शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी हे स्वतः इच्छुक असून त्यांनी मुलाखत ही दिली आहे. मात्र शिवसेनेला ही जागा मिळाल्यास कलानी परिवाराला सेनेची उमेदवारी मिळावी, यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात उल्हासनगरचा बडा व्यापारी नेता आहे.
उल्हासनगर मध्ये झालेल्या मराठी सिंधी दंगली, शिवसेना शाखाप्रमुख रमाकांत चव्हाण हत्या प्रकरण, बाळू सूर्यवंशी हत्या प्रकरण, मारुती जाधव हत्या प्रकरणात कलानी परिवाराचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असल्याने कलानी कुटूंबाला उमेदवारी दिल्यास शिवसेनेचा पारंपरिक मराठी मतदार नाराज होण्याची दाट शक्यता आहे. ही बाब बुधवारी रात्री शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, युवासेना अधिकारी बाळा श्रीखंडे आदींनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन कानावर टाकली. तसेच कलानी परिवाराला प्रवेश देऊन राष्ट्रवादी काँग्रेस प्रमाणे शिवसेना ही कलानी परिवार संपवेल, अशी भीती उल्हासनगरच्या शिवसैनिकांना आहे. त्यामुळे ओमी कलानी यांना पक्षात प्रवेश नाकारण्यात यावा तसेच उमेदवारी निष्ठावंत शिवसैनिकाला देण्यात यावे अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, युवासेना अधिकारी बाळा श्रीखंडे, नगरसेवक कलवंतसिंग सोहता, स्वप्निल बागुल, संघटक सागर उटवाल, विभाग प्रमुख शिवाजी जावळे, मनोहर बेहनवाल, महेंद्र पाटिल यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मागील महापालिका निवडणुकीच्या प्रचार दरम्यान भाजपवर तोंड सुख घेताना कुख्यात गुंड पप्पू कलानी बरोबर फोटो लावून घेण्यास इच्छुक नसल्याचे विधान केले होते. कलानी परिवाराला शिवसेनेने नेहमीच निकराची झुंज दिली आहे. कलानीच्या शहरातील एक कलमी अंमल हा शिवसेनेमुळे खालसा झाला आहे. त्यामुळे कलानी परिवाराला उमेदवारी देऊन शिवसेना आपलाच गड खालसा करते कि, भाजपमधून कलानी कुटूंब उमेदवारी मिळवून उल्हासनगरात कलनीचे साम्राज्य अबाधित राखण्यास यश मिळविते ? याकडे सर्वच राजकीय पक्षाचे लक्ष लागले आहे.

Conclusion:ulhasnagar
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.