ETV Bharat / state

सीसीटीव्हीत कैद झाल्याने अल्पवयीन सराईत चोरटा अडकला पोलिसांच्या जाळ्यात - अंबरनाथ क्राइम बातमी

एक अल्पवीयन चोरट्याला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे उल्हासनगरमधील विठ्ठलवाडी पोलिसांना गजाआड करण्यात यश आले.

सीसीटीव्ही
सीसीटीव्ही
author img

By

Published : Dec 22, 2020, 10:29 PM IST

Updated : Dec 22, 2020, 10:43 PM IST

ठाणे - एक अल्पवीयन चोरट्याला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे उल्हासनगरमधील विठ्ठलवाडी पोलिसांना गजाआड करण्यात यश आले. या अल्पवयीन चोरट्याने तीन दिवसांपूर्वी उल्हासनगर कॅम्प क्र 4 परिसरात असलेल्या एका कपड्याच्या दुनाकाचे शटर तोडून आत प्रवेश केला. त्यांनतर त्याने दुकानातील 1 मोबाईल आणि 1 लाखाची रोकड लंपास केली होती. मात्र, चोरी करतानाचा प्रकार दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाला. याच सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अंबरनाथ पूर्व भागातून अटक केली आहे. विशेष म्हणजे या अल्पवयीन चोरटा रेकॉडवरील सराईत चोरटा असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक

अल्पवयीन चोरट्याला अंबरनाथमधून अटक

उल्हासनगर कॅम्प क्र. 4 परिसरात आप्पा संभाजी मुंडे (वय 35 वर्षे) यांचे कपडे विक्रीचे दुकान आहे. 19 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास या दुकानातील लोंखडी शटर उघडून या अल्पवीयन चोरट्याने आत प्रवेश करुन दुकानातून एक मोबाईल फोन व रोख रक्कम, असा 1 लाख 10 रुपयांच्या घरफोडीचा गुन्हा विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात भा. दं. वि.चे कलम 454, 457, 380 प्रमाणे दाखल झाला होता. याच गुन्ह्याचा तपास पोलीस पथकाने सुरू केला असता सीसीटीव्ही आणि खबऱ्याच्या माहितीनुसार याच चोरट्याने अंबरनाथ पूर्व भागात घरफोडी केली असून तो अंबरनाथ पूर्व भागातच राहत असल्याची माहिती मिळाली. त्यांनतर गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षिक हर्षल राजपूत हे पोलीस पथकासह पोहोचून सीसीटीव्हीत दिसणारा हा अल्पवयीन चोरटा अंबरनाथ मधील आंबेडकर नगर येथे उभा असल्याची माहीती मिळताच पोलीस सापळा रचून दुपारच्या सुमाराला ताब्यात घेतले.

घरफोडीच्या तीन गुन्ह्याची कबुली

अल्पवीयन चोरट्याकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने उल्हासनगरमध्ये कपड्याच्या दुकानातील चोरीचा गुन्हा कबूल केला. त्यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात दोन मोबाईल फोन, रोख रक्कम व सोन्याचे दागिने, असा 1 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच त्याने विठ्ठलवाडी पोलीस ठाणाच्या हद्दीत तीन घरफोड्या केल्याची कबुली पोलिसांना दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. पी. थोरात यांनी दिली आहे.

हेही वाचा - ठाण्यात सोनसाखळी चोरीच्या घटनांत वाढ, 18 दिवसांत आठ घटना

हेही वाचा - पिसे डॅम परिसरातून 1 कोटींहून अधिक रकमेचे अमली पदार्थ जप्त

Last Updated : Dec 22, 2020, 10:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.