ETV Bharat / state

Job Condition Tata Motors Thane : सीबीएसई, आयसीएसई बोर्डातून शिक्षण घेतले तरच नोकरी; मराठी भाषा प्रेमींमध्ये संतापाची लाट

author img

By

Published : Mar 30, 2022, 6:01 PM IST

फक्त सीबीएसई, आयसीएसई बोर्डातून शिक्षण घेतलेल्यांना नोकरी देण्यात येईल, अशी अट ठाण्यातील टाटा मोटर्स कंपनीने ( Job Condition Tata Motors ) घातल्यानंतर मराठी तरुणांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेची गळचेपी सुरू असल्याची ओरड सुरू असताना नोकरीसाठी ही अट टाकल्याने ठाण्यात हा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

Job Condition Tata Motors Thane
ठाण्यातील टाटा मोटर्स कंपनीची नोकरीसाठी अट

ठाणे - फक्त सीबीएसई, आयसीएसई बोर्डातून शिक्षण घेतलेल्यांना नोकरी देण्यात येईल, अशी अट ठाण्यातील टाटा मोटर्स कंपनीने ( Job Condition Tata Motors ) घातल्यानंतर मराठी तरुणांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेची गळचेपी सुरू असल्याची ओरड सुरू असताना नोकरीसाठी ही अट टाकल्याने ठाण्यात हा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

मनसे पदाधिकाऱ्याची प्रतिक्रिया

मराठी भाषाप्रेमींचा विरोध - दोन दिवसापूर्वी ठाण्यातील टाटा मोटर्स फायनान्स कंपनीने नोकरीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. या जाहिरातीमध्ये उमेदवार सीबीएसई, आयसीएसई बोर्डातून शिक्षण घेतलेले असावे, अशी अट घालण्यात आली होती. या जाहिरातीनंतर मराठी तरुण आणि मराठी प्रेमी संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली. मराठी भाषेवर, मराठी शाळांवर प्रेम करणाऱ्या आणि यासाठी विशेष मोहीम चालवणाऱ्या संघटनांनी या सगळ्या प्रकाराचा विरोध केला आहे.

हेही वाचा - AAP Vs BJP in Maharashtra : आप कार्यकर्त्यांचा भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर हल्लाबोल; प्रवीण दरेंकराविरोधात घोषणाबाजी

कंपनीची माफी - त्यानंतर या कंपनीने ही जाहिरात मागे घेतली. मात्र, मराठी माध्यमातून शिक्षण घेतले म्हणून नोकरीसाठी अपात्र ठरवता येणार नाही. महाराष्ट्रातील मराठी माध्यमात शिकलेल्या मुलांना येथे नोकरी नाकारली जाईल, असा पायंडा भविष्यात पडू नये, मराठी शाळा वाचल्या पाहिजेत व मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना ते मराठी माध्यमात शिकले म्हणून नोकरी नाकारली जाऊ नये. यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांनी टाटा मोटर्स फायनान्स कंपनीच्या प्रशासनाची भेट घेत या प्रकारासंबंधित चर्चा केली असता, टाटा मोटर्स फायनान्स लिमिटेड कंपनीने माफी मागितली आणि ही जाहिरात बदलून सर्व ठिकाणच्या पदवीधारकांसाठी संधी उपलब्ध करून दिले असल्याचे कंपनी कडून सांगण्यात आले असल्याचे मनसे पदाधिकारी स्वप्नील महिंद्रकर यांनी सांगितले आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.