ETV Bharat / state

Jitendra Awhad On Ajit Pawar : अजित पवार आमचेच, पुण्याचे पालकमंत्री झाल्यानं आव्हाडांनी केलं अभिनंदन

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 4, 2023, 10:08 PM IST

Jitendra Awhad On Ajit Pawar: 'ठाण्याचा पठ्ठ्या' असे बिरुद डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पुण्याचे पालकमंत्री पद (Pune Guardian Minister post) मिळाल्यानंतर आव्हाड यांनी स्वतः अजित पवारांचे अभिनंदन केले आहे. एकीकडे अजित पवार यांचे अभिनंदन करताना आवडीने दुसरीकडे भाजपावर निशाणा साधला. अजित पवारांना पालकमंत्री पद मिळाले. यामुळे आम्हाला दुःख नाही. (Jitendra Awhad criticism BJP) उलट भाजपातील नेतेच दुःखी झाले असल्याची टीका त्यांनी केली.

Jitendra Awhad On Ajit Pawar
आव्हाडांनी केले अभिनंदन

पत्रकारांवरील छापेमारीचा निषेध आणि अजित पवारांचे अभिनंदन करताना जितेंद्र आव्हाड

ठाणे : Jitendra Awhad On Ajit Pawar : डॉ. जितेंद्र आव्हाड एवढ्यावरच न थांबता त्यांनी अजित पवार आमचेच असल्याचे सांगितल्याने जाणकारांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. मागील काही दिवसात पुण्याच्या पालकमंत्री पदावरून राजकीय नाराजीनाट्य रंगले होते. पालकमंत्री पदावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात संघर्ष देखील पाहायला मिळाला. या सगळ्या पार्श्वभूमीवर नवीनच जाहीर झालेल्या १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाच्या सुधारीत यादीनुसार अखेर पालकमंत्रिपदाची माळ उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गळ्यात पडली. राज्य सरकारने जाहीर केलेल्या नवीन यादीप्रमाणे पुण्याचे पालकमंत्रीपद भाजपाचे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडून काढून घेऊन अजित पवारांना देण्यात आले.

टीकेला कौतुकीच्या माध्यमातून प्रत्युत्तर: चंद्रकांत पाटील यांना पुणे ऐवजी सोलापूर आणि अमरावतीच्या पालकमंत्री पदाची धुरा देण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून बाहेर पडल्यानंतर अजित पवारांनी आव्हाड यांचा 'ठाण्याचा पट्ठ्या' असा उल्लेख करून त्यांच्यावर जाहीरपणे टीका केली होती. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी आव्हाड यांच्यावर नाराज होऊनच पक्ष सोडला असेही ते बोलले होते. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये वितुष्टता निर्माण झाली होती; परंतु आता पवार यांच्या पालकमंत्री पदाच्या नेमणुकीनंतर आव्हाड यांनी त्यांचे कौतुक केल्याने जाणकारांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

राकॉंची ठाण्यात जोरदार निदर्शने: परदेशी फंडिंगचा आरोप करीत दिल्ली पोलिसांनी 'न्यूजलिंक' या वृत्तसंस्थेच्या पत्रकारांच्या घरांवर, कार्यालयांवर छापेमारी केली. हा प्रकार पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे, अशी टीका करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यात जोरदार निदर्शने करण्यात आली. दरम्यान, ज्यांचे संविधानाने दिलेले व्यक्ती स्वातंत्र्य हिसकावून घेतले जाईल त्यांच्यासाठी आम्ही लढणार असे आव्हाड म्हणाले. 'न्यूजलिंक' या वृत्तसंस्थेशी संबंधित असलेल्या पत्रकारांच्या घरी दिल्ली पोलिसांनी छापेमारी केली आहे. मंगळवारी सकाळपासूनच पत्रकारांच्या घरी छापेमारी करण्यास सुरुवात करण्यात आली. ३० हून अधिक पत्रकारांच्या घरी छापेमारी झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच या पत्रकारांवर 'यूएपीए' कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. त्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा:

  1. ED Arrest AAP MP Sanjay Singh : 'आप'ला मोठा झटका; दारू घोटाळा प्रकरणी खासदार संजय सिंह यांना अटक
  2. Rahul Narwekar Vs Thackeray Group : राहुल नार्वेकरांचा ठाकरे गटावर गंभीर आरोप; म्हणाले, 'माझ्या निर्णय प्रक्रियेवर...'
  3. Shambhuraj Desai On Bhaskar Jadhav : भास्कर जाधव यांची चौकशी करा; शंभूराज देसाईंची मागणी, काय आहे प्रकरण?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.