ठाणे - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि कन्हैय्या कुमार यांच्या उपस्थित राष्ट्रवादीचे कळवा मुंब्रा मतदार संघातील उमेदवार आणि पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड भव्य रॅली काढत उमेदवारी अर्ज भरायला गेले होते. मात्र, अर्ज न भरताच ते निवडणूक कार्यालयातून परतले. यामुळे एकच खळबळ उडाली असून नेमकं असं का झालं? काही तांत्रिक अडचण होती का? कि काही वेगळच कारण आहे? अशा चर्चा आता जोर धरू लागल्या आहेत.
कळवा दत्त वाडी चौक ते ठाणे मनपाचे मुंब्रातील स्टेडियम अशी मोठी रॅली काढत शक्ती प्रदर्शन करत जितेंद्र आव्हाड हे आपला उमेदवारी अर्ज भरण्याकरता गेले होते. त्यांच्या साथीला गुरुवारी शरद पवार हे भर उन्हात रॅलित सहभागी झाले हे त्यांनी प्रसार माध्यमांना भावूक होवून सांगितले. नंतर स्टेडियममधील निवडणूक कार्यालयात आव्हाड गेले. मात्र, मुख्य अधिकारी यांच्याकडे न जाता आव्हाड घरी परतले. आता जितेंद्र आव्हाड आज(शुक्रवारी) उमेदवारी अर्ज भरणार का? याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.
हेही वाचा - ठाण्यात 64 उमेदवारांचे 82 उमेदवारी अर्ज दाखल