ETV Bharat / state

Jitendra Awhad Criticized: राज्य सरकारने आज राज्याभिषेक करून चूक केली, त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी - जितेंद्र आव्हाड

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे यंदाचे ३५० वे वर्ष आहे. शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत असल्याने, राजकीय वर्तुळात जोरदार खडाजंगी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Jitendra Awhad Criticized
जितेंद्र आव्हाड
author img

By

Published : Jun 2, 2023, 10:58 PM IST

प्रतिक्रिया देताना आमदार जितेंद्र आव्हाड

ठाणे: छत्रपती शिवरायांचा राज्यभिषेक हा ६ जून १६७४ रोजी झाला. महंत प्रयासन उत्तरेतून आलेले गागा भट्ट यांनी त्यांचा राज्याभिषेक केला. इथल्या त्यावेळेसच्या सनातनी मनुवादांनी महाराजांच्या तोंडावर सांगितले होते की, तुम्ही शूद्र आहात तुम्हाला राज्याभिषेक करण्याचा अधिकारच नाही. 6 जून 1674 ला राज्याभिषेक झाला. त्याचे साडेतीनशे वर्ष हे ६ जून २०२४ ला पूर्ण होतात. परंतु आज राज्याभिषेक करण्यात आला.

सगळ्या धर्माचे वाटोळे करणार का?: आजचा दिवस काय २ जून, २०२३ कोणाच्या सुपीक डोक्यातून ही कल्पना निघाली. म्हणजे शिवरायांच्या राज्याभिषेकाचा इतिहासाचा सगळ्याचा तोडमोड करणार का तुम्ही? का तर तुम्हाला सनातन धर्माचा प्रचार करायचा प्रसार करायचा आहे. म्हणून सगळ्या धर्माचे वाटोळे करणार का? शिवरायांच्या राज्याभिषेकाचे वाटोळ करणार का? तुम्हीच होतात ना ज्यांनी नाकारला होता शिवरायांना राज्याभिषेक. आज महाराष्ट्राचा इतिहास धुळीत मिळवलात.

महाराष्ट्राची माफी मागावी: आज समस्त महाराष्ट्राची ज्यांनी ज्यांनी तिथे उपस्थिती लावली, जे जे महाराजांना अपमानीत करायला वरती गेले रायगडावर त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी. तुम्हाला जर महाराजांचा इतिहास इतका ही माहिती नसेल, राज्याभिषेक कशाला झाला तर महाराष्ट्रात राहता कशाला? चालते व्हा महाराष्ट्रातून. हा शिवरायांच्या इतिहासाचा अपमान आहे. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. आपल्याला महाराष्ट्राची माफी मागावीच लागेल. असे ठाण्यात जितेंद्र आव्हाड यानी सांगितले आणि राज्य सरकारवर टीका केली.

हेही वाचा -

  1. Shivrajyabhishek Din 2023 शिवसृष्टीसाठी ५० कोटींचा निधी तर प्रतापगड प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी उदयनराजे मुख्यमंत्र्यांची घोषणा
  2. Chhatrapati Shivaji Maharaj शिवरायांची जगदंबा तलवार वाघ नखे यावर्षीच महाराष्ट्रात आणणार
  3. Shivaji Maharaj Coronation छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा शिवराज्यभिषेक दिमाखात होणार साजरा जाणून घ्या काय असणार कार्यक्रम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.