ठाणे : जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विनयंभगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या पत्नी ऋता आव्हाड मैदानात उतरल्या आहेत. मुंब्रा पोलीस ठाण्यासमोर ( Ruta Awhad in front of Mumbra Police Station ) धरणे आंदोलन, ट्विट, माध्यमांशी संवाद आणि महिला आयोगाला पत्र लिहित त्यांनी बाजू मांडली आहे. मुंब्रा पोलीस ठाण्यासमोर हजारो कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलनाला ( Slogan against CM Eknath Shinde ) बसले होते. सुडबुद्धीने ही संपूर्ण कारवाई होत असल्याचा आरोप पत्नी ऋता आव्हाड यांनी केला. बाजारपेठांमध्ये, रेल्वे स्थानकावरती असे शेकडो विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले असते. ठाण्यातले वातावरण पुन्हा एकदा चिघळल्याचे पाहायला मिळत ( Tense Situation In Thane ) आहे.
ऋता आव्हाड धरणे आंदोलन सहभागी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच मुंब्रा पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड ( Ruta Awhad ) यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून शिंदे फडणवीस सरकारला तोडीसतोड उत्तर देण्याचा इशारा दिला. राजकीय सूडापोटी आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे ते यावेळी म्हणाल्या होत्या.
ट्विटवर केले मत व्यक्त : जितेंंद्र आव्हाड यांच्यासाठी पत्नी ऋता सामंत पुढे आल्या ( Women Commission in Jitendra Awad case ) आहेत. त्यांनी ट्विटवर त्यांचे मत व्यक्त केले होते. ज्या महिलेने ही तक्रार दाखल केली आहे, त्यांच्याकडे मोटीव्ह आहे. छट पुजेवरून झालेल्या बाचाबाचीत त्या महिलेवर अनेक गुन्हे दाखल असून त्या जामिनावर आहेत. जितेंद्र आव्हाडांविरोधात आक्षेपार्ह बोलल्या आहेत. अंगावर धडकणाऱ्या व्यक्तिला बाजूला करणे गुन्हा असेल तर बाजारात, ट्रेन मध्ये, रेल्वे पुलावर, गर्दीमध्ये रोज शेकड्यांनी विनयभंग होत असतील. ह्या राजकारणी महत्वाकांक्षा बाळगतात. रात्री त्या कुणाला तरी भेटल्या. त्यांच्यावर पण अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. जे काही घडले ती स्पोन्टेनिअस रिऐक्शन होती. त्याला विनयभंग म्हणता येत नाही, असे ऋता सामंत यांनी म्हटले आहे.
-
ज्या महिलेने ही तक्रार दाखल केली आहे, त्यांच्याकडे मोटीव्ह आहे. छट पुजेवरून झालेल्या बाचाबाचीत रीदा रशिद यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्या जामिनावर आहेत. NCP व आव्हाडांविरोधात आक्षेपार्ह बोलल्या आहेत.
— Ruta Samant (@RutaSamant) November 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">ज्या महिलेने ही तक्रार दाखल केली आहे, त्यांच्याकडे मोटीव्ह आहे. छट पुजेवरून झालेल्या बाचाबाचीत रीदा रशिद यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्या जामिनावर आहेत. NCP व आव्हाडांविरोधात आक्षेपार्ह बोलल्या आहेत.
— Ruta Samant (@RutaSamant) November 14, 2022ज्या महिलेने ही तक्रार दाखल केली आहे, त्यांच्याकडे मोटीव्ह आहे. छट पुजेवरून झालेल्या बाचाबाचीत रीदा रशिद यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्या जामिनावर आहेत. NCP व आव्हाडांविरोधात आक्षेपार्ह बोलल्या आहेत.
— Ruta Samant (@RutaSamant) November 14, 2022
राज्य महिला आयोगाकडे तक्रार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जितेंद्र आव्हाड इतर अनेक राजकीय नेते शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत विविध विकास प्रकल्पाचे उदघाटन भूमीपूजन कार्यक्रम झाला. मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळगर्दीत एक महिला आव्हाडांच्या समोर येत असताना त्यांनी त्या महिलेला हात धरून बाजूला केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या महिलेने जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा 354 कलम अनुसार मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मात्र हा विनयभंग प्रकार नाही; अशी भूमिका घेत जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली.
कायदेशीर कारवाईची मागणी : ऋता जितेंद्र आव्हाड यांचा तक्रार अर्ज आयोग कार्यालयास प्राप्त झाला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कलम ३५४ चा खोटा गुन्हा राजकीय सुडबुद्धीने दबावतंत्र वापरुन दाखल केला, असल्याने सदर गुन्हा रद्द करुन फिर्यादी महिलेवर खोटा गुन्हा दाखल केला म्हणून कायदेशीर कारवाई करावी, असे त्यांनी त्यात नमूद केले (factual report in Jitendra Awad Molestation case)आहे.