ठाणे : भिवंडी शहर, ग्रामीण भागात अंमली पदार्थांसह अमली पदार्थांची विक्री करणारे अमली पदार्थ विक्रेते मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे शेकडो युवक अंमली पदार्थांच्या आहारी जात आहे. स्थानिक भिवंडी पोलीस प्रशासन गेल्या काही महिन्यांपासून ऑक्शन मोडवर आले आहे. पोलीस उपआयुक्त नवनाथ ढवळे यांच्या मागर्शनाखाली शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बहुतांश नशेच्या सौदागरांना जेलमध्ये डांबण्यात आहे. मात्र, काही दिवसापासून पुन्हा नशेचे सौदागरानी नश्या विक्रीचा सौदा सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.
अंमली पदार्थाचा गोरखधंदा : या माहितीच्या आधारे भिवंडी पोलिस परिमंडळ क्षेत्रात अंमली पदार्थाचा गोरखधंदा करणाऱ्या सौदागरांवर कारवाई करण्याचे सक्त आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. त्यातच भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना (एमडी) हा मादक पदार्थ विक्रीचा गोरखधंदा करणारा येत असल्याची माहिती मिळाली होती. भिवंडीतील मंडई भागातील बाजारपेठ येथील नवी चाळ या ठिकाणी आमली पदार्थ विक्री करणार होते.
16.50 ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन जप्त : या माहितीच्या आधारे १९ मे रोजी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मोरे, प्रफुल्ल जाधव, धनराज केदार, पोलीस उपनिरीक्षक रमेश शिंगे , रामसिंग चव्हाण , साहाय्यक पोलीस उपनिरिक रामचंद्र जाधव, पोलीस नाईक सचिन जाधव, भावेश घरत, पोलीस शिपाई जालिंदर साळूंके , प्रशांत बर्वे , अमोल इंगळे, तुळशीराम बांगर या पोलिस पथकाने नवी चाळ बाजारपेठ रोड वरील तीनबत्ती नाका येथील आकाश ट्रेडर्स समोर सापळा रचला. त्यावेळी आरोपी जमशेद दिसताच पोलीस पथकाने त्याच्यावर झडप घालून त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळ 1 लाख 12 हजार रुपये किमतीचे 16.50 ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन (एम डी) हा अंमली पदार्थ आढळून आला आहे.
विविध कलमानुसार गुन्हा : दरम्यान, नशेचा सौदागर जमशेदवर भिवंडी शहर पोलिस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. तसेच त्याच्या जवळून मेफेड्रॉन (एमडी) हे मादक पदार्थ जप्त करण्यात आले. आरोपी जमशेदला २० मे रोजी न्यायालयात हजर केले असता अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास भिवंडी गुन्हे शाखाचे पथक करीत आहे.
हेही वाचा-