ETV Bharat / state

Ink Attack on Ayodhya Pol : ठाकरे गटाच्या पदाधिकारी अयोध्या पोळ यांना शाईफेक करत मारहाण, कार्यक्रमाला फसवून निमंत्रण देल्याचा पोळ यांचा आरोप - अयोध्या पोळला ठाण्यात मारहाण

सोशल मीडियावर शिवसेना ठाकरे गटाची बाजू मांडणाऱ्या आयोध्या पोळ यांना कळव्यात मारहाण झाली आहे. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे मांडण्यात त्या आघाडीवर होत्या.

अयोध्या पोळ यांना शाईफेक करत मारहाण
अयोध्या पोळ यांना शाईफेक करत मारहाण
author img

By

Published : Jun 17, 2023, 7:50 AM IST

Updated : Jun 17, 2023, 9:44 AM IST

अयोध्या पोळ यांना शाईफेक करत मारहाण

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. कळव्यातील मनीषा नगर येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सोशल मीडियाच्या राज्य समन्वयक अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक करत मारहाण करण्यात आली. मारहाण झाल्यानंतर आपली प्रतिक्रिया देताना पौळ म्हणाल्या हा कार्यक्रम ठाकरे गटाचा कार्यक्रम नव्हता. मारहाण करण्यासाठी ट्रॅप रचण्यात आला असल्याचा आरोप यावेळी पौळ यांनी केला. मिंधे गट कुठून कोणती शक्कल लावतील याचा काही नेम नाही, असा आरोप यावेळी ठाकरे गटाकडून करण्यात आला.

कुठे होता कार्यक्रम : कळव्यातील मनीषा नगर येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ठाकरे गटाकडून कार्यक्रम ठेवण्यात आला होता. तसेच सुषमा अंधारे आणि खासदार राजन विचारे, ठाकरे गट ठाणे जिल्हा अध्यक्ष केदार दिघे देखील या कार्यक्रमास येणार असल्याचे भासवण्यात आले. त्यानुसार पोळ यांना कार्यक्रमाचे आमंत्रित करण्यात आले असे महिला पदाधिकारी यांनी सांगितले. दरम्यान यावेळी सर्व महापुरुष यांच्या फोटोला हार घालत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला शेवटी हार का घातला म्हणून स्थानिक महिलांनी पौळ यांच्यावर प्रथम शाई फेकली. त्यानंतर मारहाण करत अंगावर मोठ्या संख्येने धावून आल्या. यावेळी ठाकरे गटाच्या कोणताही पदाधिकारी या ठिकाणी नाहीत हे लक्षात आले.

मारहाणीसाठी ट्रप रचला : दरम्यान मात्र ठाकरे गटाचा कार्यक्रम नसून हा ट्रॅप रचण्यात आला असल्याचे स्थानिक ठाकरे गटातील महिला पदाधिकारी यांनी सांगितले. यावेळी कळवा पोलीस स्टेशनमध्ये अयोध्या पौळ यांनी तक्रार नोंदवली आहे. पोलीस स्टेशन बाहेर जमलेल्या शिंदे गटाच्या महिला तसेच पुरुष कार्यकर्त्याना पोलिसांनी गोंधळ घालत असल्यामुळे पांगवले होते. आयोध्या पौळ यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली तो कार्यक्रम शिवसेना ठाकरे गटाचा असल्याचे सांगत त्यांना निमंत्रण देण्यात आले होते. परंतु या कार्यक्रमाला ठाकरे गटातील कोणीच नेतेमंडळी आले नव्हते. आयोध्या पौळ ह्या सोशल मीडियावर ठाकरे गट शिवसेनेच्या बाजू मांडत असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांवर त्या आक्रमक भाषेत टीका करत असतात. दोन - तीन दिवसापूर्वी त्यांनी शितल म्हात्रे यांच्यावर ट्विट करून टीका केली होती. आयोध्या पौळ या परभणी जिल्ह्यातील आहेत.

हेही वाचा -

  1. Shinde vs Fadnavis : मुख्यमंत्री शिंदे गटाला डिवचणारे शहरात लागले बॅनर, राज्यात शिंदे यांच्या जाहिराती नंतर बॅनरवॉर
  2. Eknath Shinde On Advertisement : जाहिरातीमुळे आमची युती तुटणार नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Last Updated : Jun 17, 2023, 9:44 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.