ETV Bharat / state

तिहेरी तलाकचा राज्यातील पहिला गुन्हा ठाण्यात दाखल; पतीने व्हॉट्सअ‌ॅपवर पाठवला संदेश - मुस्लीम महिला विवाह कायदा

ठाण्यातील कौसा मुंब्रा येथील एका उच्च शिक्षित महिलेने 'मुस्लीम महिला विवाह कायदा (लग्नासंबंधी हक्कांचे संरक्षण) अंतर्गत आपल्या पती विरोधात तक्रार दाखल केली आहे. यानंतर तिच्या पतीवर गून्हा दाखल करण्यात आला आहे. तिहेरी तलाक विरोधी कायदा बनल्यानंतर गून्हा दाखल होण्याची महाराष्ट्रातील ही पहीलीच वेळ आहे.

तिहेरी तलाकचा पहीला गून्हा मुंबईत दाखल
author img

By

Published : Aug 2, 2019, 5:13 PM IST

Updated : Aug 2, 2019, 7:18 PM IST

ठाणे - मुंब्र्यातील एका महिलेने 'मुस्लीम महिला विवाह संरक्षण कायदा' अंतर्गत आपल्या पती विरोधात तक्रार दाखल केली आहे. तिच्या पतीने व्हॉट्सअ‌ॅपवर 3 वेळा तलाक असे लिहून तिला गेल्या वर्षीच घटस्फोट दिला होता. त्यामुळे या महिलेने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. नव्याने बनवण्यात आलेल्या तिहेरी तलाक कायद्याअंतर्गत पोलिसांनी तिच्या पतीवर गुन्हा दाखल केला आहे.

indias-first-complain-against-tripal-talaq-in-mumbra
नवऱ्याने वॉट्सअपवर दिला होता तलाक

काय आहे नेमके प्रकरण ?

या महिलेचे एमबीए झालेले असून, तिला 6 महिन्यांचा मुलगा आहे. पतीचे नाव इम्तियाज गुलाम पटेल असून तो 35 वर्षांचा आहे. गेल्यावर्षी त्याने आपल्या पत्नीला व्हॉट्सअ‌ॅपवर तलाक दिला होता. तलाक दिल्यानंतर गेल्या वर्षीपासून तो दुसऱ्या महिलेसोबत लग्न करून राहत असल्याची तक्रार या महिलेने केली आहे. पतीसोबतच सासू आणि नणंद यांच्याबद्दलही या महिलेने छळ होत असल्याची तक्रार दाखल केली आहे.

तिहेरी तलाकचा राज्यातील पहिला गुन्हा ठाण्यात दाखल

महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 'मुस्लीम महिला विवाह संरक्षण कायदा' अंतर्गत या पुरूषावर गुन्हे दाखल केले आहेत. या कायद्यात अंतर्गत विनाजामीनपात्र गुन्हा व 3 वर्ष कारावासाची शिक्षेची तरतूद आहे.

हेही वाचा...

तिहेरी तलाक हद्दपार; विधेयकाला राष्ट्रपतींची मंजूरी

मोदी सरकारला ऐतिहासिक यश; तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत मंजूर

'या' देशांमध्येही आहे तिहेरी 'तलाक'वर बंदी; नावं वाचून तुम्हालाही बसेल धक्का!

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Aug 2, 2019, 7:18 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.