ETV Bharat / state

Indian Students in Ukrain : महाराष्ट्रासह भारतातील ५०० विद्यार्थी बँकरमधून बाहेर; मायदेशी परतणार - रशिया भारत युद्ध भारतावर परिणाम

युक्रेनमध्ये शिक्षणासाठी भारत देशासह महाराष्ट्रातील गेलेल्या ५०० विद्यार्थी बंकरमधून बाहेर पडले आहेत. ( 500 Student in Ukrain Bunker ) काही तासातच हे विद्यार्थी मायदेशी परतणार असल्याची माहिती युक्रेन मधील बुकोविनियन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या प्रतीक संतोष चव्हाण याने दिली आहे.

Indian Students in Ukrain came outside bunker will return to india

author img

By

Published : Feb 26, 2022, 4:51 PM IST

Updated : Feb 26, 2022, 5:11 PM IST

ठाणे - युक्रेनमध्ये शिक्षणासाठी भारत देशासह महाराष्ट्रातील गेलेल्या ५०० विद्यार्थी बंकरमधून बाहेर पडले आहेत. ( 500 Student in Ukrain Bunker ) काही तासातच हे विद्यार्थी मायदेशी परतणार असल्याची माहिती युक्रेन मधील बुकोविनियन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या प्रतीक संतोष चव्हाण याने दिली आहे.

प्रतिक्रिया

२८ विद्यार्थी गेले होते -

२३ फेब्रुवारी रोजी युक्रेनमध्ये अडकलेल्या ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये भिवंडी शहरातील चव्हाण कुटूंबातील प्रतीक याने वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमधील बुकोविनियन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. विशेष म्हणजे प्रवेश प्रक्रिया पार पडणाऱ्या एजन्सीने २१ फेब्रुवारी रोजी युनिव्हर्सिटीमध्ये ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया व एक परीक्षा असल्या कारणे सांगत तत्काळ २२ फेब्रुवारी रोजी युक्रेनला जाणे गरजेचे असल्याचे सांगितले. मात्र, तेथील युद्धजन्य परिस्थिती मुळे प्रतीकचे आईवडील त्यास पाठविण्यास तयार नसताना एजन्सीने या प्रवेश व परिक्षेसाठी प्रत्यक्ष हजर असणे आवश्यक असल्याचे सांगितले. यामुळे प्रतीक यास त्याच्या सोबतीने २८ विद्यार्थी गेले. २३ फेब्रुवारी रोजी सर्व बुकोविनियन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये पोहचले होते.

संतोष चव्हाण यांनी त्यांच्या मुलाशी साधलेला संवाद

प्रतीक माघारी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुकडीत -

विद्यार्थी परीक्षा देत असतानाच त्यांना युद्ध सुरू झाल्याचे युनिव्हर्सिटी कसून सांगण्यात आल्याने हॉस्टेलमध्ये थांबण्यास व फक्त गरजेपुरते साहित्य सोबत घेऊन तयार राहण्यास सांगितले. मात्र, या बातमीनंतर प्रतीकचे कुटुंबीय भयभीत झाले आहेत. त्यानंतर भारतीय दूतावास व इंडियन स्टुडंट असोसिएशन यांच्या प्रयत्नातून प्रतीक माघारी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुकडीत येत असल्याचे समजले असता कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र, जोपर्यंत प्रतीक घरी परतत नाही तोपर्यंत भय कायम असल्याचे सांगण्यात आले.

मुस्कान याबद्दल बोलताना

हेही वाचा - Russia Ukraine Crisis : 'युद्ध सुरुयं, मला शस्त्र द्या, पळ काढण्यासाठी विमान नाही'; युक्रेन राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेची ऑफर फेटाळली

विद्यार्थ्यांना माघारी आणण्यासाठी प्रयत्न सुरू -

प्रतीक सोबतच भिवंडी शहर व जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले असून त्यामध्ये तालुक्यातील पडघा येथील मुस्कान फिरोज शेख ही एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीची सुध्दा समावेश आहे. विशेष म्हणजे युद्धामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या कीव या शहरात ती असल्याने तिच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. एक दिवस आधी मुस्कानने संपर्क करून बँकरमध्ये मैत्रिणी सोबत असल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर तिचा संपर्क न झाल्याने कुटुंबीय भयभीत असून भारत सरकारने युक्रेनमध्ये शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना माघारी आणण्यासाठी प्रयत्न करावेत आमच्या मुलांचा आमच्याशी संपर्क करून द्यावा, अशी विनंती पालकांनी केली आहे .

Last Updated : Feb 26, 2022, 5:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.