ETV Bharat / state

अनैतिक संबंध असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीच्या प्रियकराचा खून - Immoral relationship murder

पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा राग मनात धरून पतीने पत्नीच्या प्रियकराचा खून केल्याची घटना बेलापूर सीबीडी दिवाळे गाव परिसरात घडली आहे. पोलिसांनी अवघ्या 12 तासात आरोपीला गजाआड केले आहे.

Immoral relationship murder
आरोपी
author img

By

Published : Jan 3, 2021, 10:18 PM IST

नवी मुंबई - पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा राग मनात धरून पतीने पत्नीच्या प्रियकराचा खून केल्याची घटना बेलापूर सीबीडी दिवाळे गाव परिसरात घडली आहे. पोलिसांनी अवघ्या 12 तासात आरोपीला गजाआड केले आहे.

माहिती देताना नवीन मुंबई परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे

हेही वाचा - कल्याणात घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट, सुदैवाने जीवित हानी नाही

दिवाळे गावात राहणाऱ्या प्रसाद कोळी याच्या पत्नीचे त्याच गावात राहणाऱ्या सोमनाथ कोळी (वय 39) याच्याशी अनैतिक संबंध होते. हा राग मनात धरून प्रसाद कोळी (वय 27) याने नागेश कोळी (वय 23), दत्ता कोळी (वय 30), योगेश कोळी (वय 25) या त्याच्या तीन भावांच्या साथीने ३० डिसेंबरला सोमनाथ केळीची हत्या केली.

आरोपींनी बेलापूर परिसरातील मिनाक्षी बार येथून सोमनाथचे अपहरण केले व दिवाळे खाडी जवळ दगडाने ठेचून त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह दिवाळे खाडीलगत लपवून ठेवण्यात आला. नंतर सोमनाथ हा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. दिवाळे रेतीबंदर खाडी जवळ सोमनाथ याचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तपासाची सुत्रे हलविली व याप्रकरणी सदर चौघांना अवघ्या 12 तासात अटक केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.