ठाणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ठाण्यातील उत्तर सभेत भोंगे उतरवण्याबाबत 3 मे पर्यंतची मुदत दिली आहे. यावरून मुस्लिम समाजात रोष दिसुन येत आहे. त्यातच मुंब्रा मधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेने मशिदीबाहेर मोठ्या संख्येने जमून पोलिसांना निवेदन दिले. यात भोंग्यांना हात लावला तर आम्ही सोडणार नाही, अशी भूमिका मांडली आहे. आमचा धर्म आमचे मदरशे अजाण यांचा काही जणांना त्रास होत आहे, ते वातावरण खराब करत आहेत. आम्हाला शांतता हवी आहे असे वतीने सांगण्यात आले.
तर राज ठाकरे यांच्या भोंग्या विरोधी वक्तव्यानंतर राज्यभर जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता या संघटनेने वर्तवली आहे. या आंदोलना अगोदर मुंब्रा पोलिसांनी या संघटनेचे अब्दुल मतीन शेखानी यांना जमाव बंदी कायद्यानुसार नोटीस बजावल्या नंतरही त्यांनी हे आंदोलन केल्याने मुंब्रा पोलिसांनी शेखानी यांच्यावर बेकायदेशीररित्या जमावबंदी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.