ठाणे - राज्याला मिळालेले पैसे केंद्राला परत दिले असतील, तर ते पाप आहे. तसे झाले असेल, तर महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती देवेंद्र फडणवीसांना शाप देईल, अशी कठोर टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माजी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.
हेही वाचा - महाराष्ट्रात राजकीय मग्रूरीचा अंत, जितेंद्र आव्हाडांचा भाजपवर निशाणा
आव्हाड म्हणाले, 'माझा विश्वास बसत नाही. परंतु, देंवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या वाट्याला आलेले ४० हजार कोटी केंद्राला परत पाठवले असतील, तर ते पाप आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तसे केले असेल, तर महाराष्ट्र त्यांना कधी माफ करणार नाही. राज्यातील प्रत्येक व्यक्ती त्यांना शाप देईल.' देशातील ८० टक्के आयकर मुंबई भरते. कर रुपाने लाखो कोटी रुपये राज्यातून केंद्राला मिळतात. त्यामुळे त्या पैशांवर आपला हक्क आहे आणि तो आपल्याला मिळाला पाहिजे, अशी भूमिका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मांडली आहे.