ठाणे - राज्यातील अनेक महापालिकेच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. त्या निवडणूका कधी लागतील हे आतच सांगता येत नाही. विद्यमान सरकारला अनुकूल वातावरण दिसत नसल्याने निवडणुका होणार नाहीत. त्याच्या बाजूने अनुकूल वातावरण निर्माण होईल अस मला वाटत नसल्याचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड ( NCP MLA Jitendra Awhad ) यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितले. एकीकडे आता ठाणेकर जनता आत पर्याय शोधत असून आगामी पालिका निवडणुकीत मतविभागणी होणार असून याचा फायदा राष्ट्रवादीला होणार आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेवर ( Thane Municipal Corporation ) राष्ट्रवादी काँग्रेसचा ( Nationalist Congress ) झेंडा फडकणार असल्याचे भाकीत आव्हाडांनी केले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदीवसानिनित कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन ठाण्यातील एनकेटी सभागृहात करण्यात आले होते. यावेळी अनेक वक्त्याकडून कार्यकर्त्यांना धडे देण्यात आले होते. त्यावेळी आव्हाडांनी वरील विधान केले.
विनाकारण विरोधकावर गुन्हे - राज्यासह ठाणे जिल्हयात राजकिय वातावरण बादलेले असून विनाकारण विरोधकावर गुन्हे दाखल करण्याची पद्धत सुरू झाली आहे. उत्तरप्रदेशात जसे राजकारण सुरु आहे. तसेच राजकारण राज्यात ठाण्यात सुरु आहे. ठाण्यातील पोलिसांचा देखील विश्वास नाही, गुन्हे दाखल करून आमच्यावर दबाव असल्याचे पोलीस बोलत असल्याचे आव्हाडांनी यावेळी सांगितले. माझ्यावर दोन गुन्हे दाखल झाले. या दोन्ही गुन्ह्यामध्ये जामीन घेताना हे गुन्हा नाहीत असे न्यायाधीश सांगत आहे, माझ्यावर मुद्दामून गुन्हे दाखल करून त्या गुन्ह्यामध्ये वाढ करून न्यायालयासमोर हा गुन्हेगार प्रवृत्तीचा असल्याचे सत्ताधार्यांना भासवायचा असल्याचे आव्हाडांनी सांगितले. त्यामुळे कार्यकर्त्याना फसवायचे, जाळ्यात अडकवायचे सुरु असून त्या जाळ्यात अडकवू नका असा सल्ला आव्हाडांनी कार्यकर्त्यांना दिला.
सीबीआय चौकशी लागेल तरी मी शरण जाणार नाही - माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून न्यायालयात हा मोठा गुन्हेगार असल्याचे सांगून माझी सीबीआय चौकशी देखील लागू शकते त्यामुळे मी तशी तयारी करून ठेवली असून २८ दिवस कारागृहात जाईन मात्र शरण जाणार नसल्याचे आव्हाडांनी सांगितले. माझ्यावर गुन्हे दाखल झाले त्या नंतर मी मुख्यमंत्री शिंदे याना भेटायला गेलो,तेव्हा मला काहीच माहित नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मला सांगितले असल्याने मला आश्यर्य वाटतं असल्याचे सांगत लढणार पण मागे नाही फिरणार असे यावेळी आव्हाडांनी बोलताना सांगितले.
आव्हाडांना दिघेंची आठवण - माझी लढाई आनंद दिघे पासून सुरु आहे, मात्र तेव्हा असे विचित्र,खुनशी आणि द्वेषचे राजकारण नव्हेत मात्र सध्यचे राजकारण बघता ठाण्यात आणि महाराष्ट्र्र कोणीच बघितलेले नसल्याचे सांगत आव्हाडांनी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आठवणीतून तेव्हाचे राजकारण कसे होते याबद्दल आठवणी ताज्या केल्या.
मी स्वतः ठाण्यात फिरणार - आगामी पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सुशिक्षित उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. लोकांनाही आता पर्याय हवा आहे. त्यामुळे प्रत्येक विभागात आपण जोमाने काम करूया. चौकसभा घेऊया, सभा घेऊ, रॅली काढू आणि द्वेश राजकरणला प्रेमाने बदलू यासाठी मी स्वतः रस्त्यावर उतरणार असल्याचे आव्हाडांनी सांगितले.