ETV Bharat / state

'मी माझ्या पक्षावर कधीही टीका केली नाही, पक्ष आणि मी एकरूप'

नवी मुंबईत भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनप्रसंगी बोलताना एकनाथ खडसे यांनी 'मी माझ्या पक्षावर कधीही टीका केली नाही. माझी टीका व्यक्तीवर असू शकते, पक्ष आणि मी एकरूप आहे', असे वक्तव्य केले. गेल्या अनेक दिवसांपासून पक्षातील नेत्यांवर टीका करत असल्याने ते पक्षांतर करतील अशी चर्चा होती. मात्र, आता त्यांनी 'यूटर्न' घेतल्याचे दिसत आहे.

एकनाथ खडसे
एकनाथ खडसे
author img

By

Published : Feb 15, 2020, 5:34 PM IST

Updated : Feb 15, 2020, 6:13 PM IST

नवी मुंबई - मी माझ्या पक्षावर कधीही टीका केली नाही. माझी टीका व्यक्तीवर असू शकते, पक्ष आणि मी एकरूप आहे, असे एकनाथ खडसे नवी मुंबईत भाजपच्या पार पडत असलेल्या राज्यस्तरीय अधिवेशनप्रसंगी म्हणाले. या अधिवेशनात राज्यभरातील भाजपचे खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित आहेत.

भाजप नेते एकनाथ खडसे

महाविकास आघाडी सरकारमध्ये वेगवेगळ्या विषयांवर मत-मतांतरे आहेत आणि हळूहळू ती उघड होत आहेत. अशी मतांतरे वाढून त्यांनी जी महाविकास आघाडी केली आहे ती मोडेल. सद्यस्थितीत मध्यावधी निवडणुका होतील का? या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी मध्यावधी निवडणुका तूर्तास तरी होणार नाहीत, असे म्हटले.

हेही वाचा - 'शेतकऱ्यांना सात-बारा घेऊन फिरण्याची गरज नाही, ऑनलाइन सात-बारा ग्राह्य ठरेल'

भाजपमधील अंतर्गत कलहामुळे नाराज असलेल्या एकनाथ खडसे यांनी वारंवार पक्षातील काही नेत्यांवर टीका केली. विधानसभेच्या निकालानंतर भाजप-शिवसेनेची युती तुटून महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर तर त्यांनी अधिकच आक्रमक होऊन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले होते. त्यामुळे ते इतर पक्षांच्या मार्गावर असल्याचे बोलले जात होते. मात्र, सध्याच्या त्यांच्या वक्तव्यावरून ते भाजपशी काडीमोड घेणार नसल्याचे दिसत आहे.

Last Updated : Feb 15, 2020, 6:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.