ETV Bharat / state

व्हॉटसअपवर 'तिहेरी तलाक' देणाऱ्या पतीला ७ महिन्यानंतर बेड्या - triple talakh on Whats App

व्हॉटसअपवर 'तिहेरी तलाक' देणाऱ्या पतीला भिवंडीतील भोईवाडा पोलिसांनी ७ महिन्यानंतर बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे आरोपी पती तलाक दिल्यानंतर दुबईत पळून गेला होता.

ठाणे
ठाणे
author img

By

Published : Feb 6, 2020, 8:57 PM IST

ठाणे - पत्नीला व्हॉटसअपवर 'तिहेरी तलाक' देणाऱ्या पतीला भिवंडीतील भोईवाडा पोलिसांनी ७ महिन्यानंतर बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे आरोपी पती तलाक दिल्यानंतर दुबईत पळून गेला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याचा पासपोर्ट नंबर प्राप्त करून त्याच्या विरोधात 'लूक आउट' नोटीस बजावली होती. मात्र, नोटीस बजावल्याची कुणकुण लागल्याने तो भारतात परत येताना मुंबई विमानतळ पोलीस अटक करतील या भीतीने न उतरता, तो अमृतसर विमानतळावर उतरला असता त्याला अमृतसर पोलिसांनी ताब्यात घेऊन भोईवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. नदीम शेख असे पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आरोपी पतीचे नाव असून तो टेक्निकल अभियंता आहे.

पीडित महिला
पीडित महिला

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आरजू शेख (23 रा. दिवनशाहा दर्गा) हिचा 18 मे 2014 रोजी नदीम याच्यासोबत मुस्लीम धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे निकाह (लग्न) झाला होता. त्यावेळी हुंडा म्हणून आरजूच्या आई-वडिलांनी जावई नदीम यास 10,051 रुपये रोख व संसारोपयोगी वस्तू हुंडा म्हणून दिल्या होत्या. मात्र, लग्नाच्या काही दिवसानंतर पीडित पत्नीला पती व तिच्या सासरच्या मंडळींनी तू पसंद नसल्याचे कारण देत तिला शिवीगाळ करून मारझोड नेहमीच करीत होते. तर आरोपी नदीम हा तिच्या चारित्र्यावर संशयही घेत असे, मात्र एवढा त्रास सहन केल्यानंतरही पीडित महिलेने पाच वर्ष आपला संसार टिकवून ठेवला होता. .

आरोपी पती
आरोपी पती

हेही वाचा - ठाण्यात शरीरसौष्ठव स्पर्धा उत्साहात पडली पार

नदीम व आरजू यांना एक चार वर्षाचे मूलही आहे. परंतु, तलाक देण्याआदी आरोपी नदीमने घर घेण्यासाठी ५ लाखांची मागणी पत्नीकडे केली होती. ते न देऊ शकल्याने पीडित पत्नीला बेदम मारहाण करून तिला घरातून बाहेर काढून देण्यात आले होते. तसेच व्हॉट्सअपवर तिहेरी तलाक देऊन तलाक झाल्याचे सांगितले गेले. हे शब्द तिने व्हॉटसअपवर पहिल्यानंतर तिच्या पायाखालची जमीन सरकली, यानंतरही पत्नीने आरोपी पती नदीम यास संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु, नदीमने आपला तलाक झाला असल्याचे सांगत संपर्क टाळण्यास सुरुवात केल्याने पीडितेने न्यायाची अपेक्षा करत भोईवाडा पोलीस ठाण्यात व महिला मंडळात धाव घेत तिहेरी तलाकची तक्रार दाखल केली होती.

आज आरोपी नदीमला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली आहे.

व्हॉटसअपवर तिहेरी तलाक
व्हॉटसअपवर तिहेरी तलाक

हेही वाचा - वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालणे पडले महागात; न्यायालयाने ठोठावला पाच हजारांचा दंड

Intro:kit 319Body: व्हाटसअपवर तिहेरी 'तलाक' देणाऱ्या पतीला ७ महिन्यानंतर बेड्या

ठाणे : पत्नीला व्हाटसअपवर तिहेरी 'तलाक' देणाऱ्या पतीला भिवंडीतील भोईवाडा पोलिसांनी ७ महिन्यानंतर बेड्या ठोकल्या आहेत.
विशेष म्हणजे आरोपी पती तलाक दिल्यानंतर दुबईत पळून गेला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याचा पासपोर्ट नंबर प्राप्त करून त्याच्या विरोधात लूक आउट नोटीस बजावली होती. मात्र नोटीसी बजावल्याची कुणकुण त्याला लागल्याने तो भारतात परत येताना मुंबई विमानतळ पोलिस अटक करतील या भीतीने न उतरता. तो अमृतसर विमानतळावर उतरला असता त्याला अमृतसर पोलिसांनी ताब्यात घेऊन भोईवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. नदीम शेख असे पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आरोपी पतीचे नाव असून तो टेक्निकल इंजिनीअर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला आरजू शेख (23 रा. दिवनशाहा दर्गा ) हिचा 18 मे 2014 रोजी आरोपी नदीम याच्यासोबत मुस्लिम धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे निकाह झाला होता. त्यावेळी हुंडा म्हणून आरजूच्या आई-वडिलांनी जावई नदीम यास 10,051 रुपये रोख व संसारोपयोगी वस्तू हुंडा म्हणून दिल्या होत्या. मात्र लग्नाच्या काही दिवसानंतर पीडित पत्नीला पती व तिच्या सासरच्या मंडळींनी तू पसंद नसल्याचं कारण देत तिला शिवीगाळ करून मारझोड नेहमीच करीत होते. तर आरोपी नदीम हा तिच्या चारित्र्यावर संशयही घेत असे, मात्र एवढा त्राससहन केल्यानंतर ही पीडित महिलेने पाच वर्ष आपला संसार टिकवून ठेवला होता. नदीम व आरजू यांना एक चार वर्षाचे गोंडस बाळही आहे. परंतु तलाक देण्याआदी आरोपी नदीमने घर घेण्यासाठी ५ लाखांची मागणी पत्नीकडे केली होती. ते न देऊ शकल्याने पीडित पत्नीला बेदम मारहाण करून तिला घरातून बाहेर काढून देण्यात आलं होते. तसेच व्हाट्सअपवर तिहेरी तलाक देऊन तलाक झाल्याचं सांगितलं गेलं. हे शब्द तिने व्हॉटसअप वर पहिल्यानंतर तिच्या पायाखालची वाळू सरकली, यानंतरही पत्नीने आरोपी पती नदीम यास संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु नदीमने आपले तलाक झाले असल्याचे सांगत संपर्क टाळण्यास सुरवात केल्याने पीडित पत्नीने न्यायाची अपेक्षा करत भोईवाडा पोलीस ठाण्यात व महिला मंडळात धाव घेत तिहेरी तलाकची तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, मुस्लिम महिलांना दिलासा मिळावा या करीता तिहेरी तलाकवर बंदी आणून मोदी सरकाराने संसदेत कायदा पारित केला आहे. तर दुसरीकडे कायदा पारित होतानाच पतीने हुंड्यासाठी आपल्या पत्नीला चक्क व्हाटसअपवरुन तलाक, तलाक, तलाक अशा मेसजच्या माध्यमातुन तिहेरी तलाक देण्याचा प्रकार ७ महिन्यापूर्वी समोर आला होता. आज आरोपी नदीमला न्यायालयात हजर केले असता अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे.

Conclusion:bhiwnadi
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.