ETV Bharat / state

कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळली शेकडो आधारकार्ड; मुंब्रा देवारीपाडा येथील घटना

आधारकार्ड ही भारतीय असल्याची ओळख असल्याने या कार्डचे मोठे महत्व आहे. याच आधारकार्ड नसल्यामुळे गरिबांना रेशनचे धान्य मिळत नाही. आधारकार्डच्या सहाय्याने बँक खात्यासह अनेक ठिकाणी प्राथमिकतेने त्याचा वापर करण्यात येत आहे.

कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळले शेकडो आधारकार्ड
author img

By

Published : Jun 19, 2019, 10:23 PM IST

ठाणे - मुंब्रा कौसा परिसरातील देवारीपाडा येथील हसरा शाळेच्या पाठीमागील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शेकडो आधारकार्ड आढळल्याने एकच खळबळ उडाली. हे आधारकार्ड बेवारस असल्याने हे बनावट बनविल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. किंवा पोस्टमनने लोकांची आलेली आधारकार्ड वितरित न केल्याने ती नष्ट करण्याच्या उद्देशाने कचऱ्यात फेकल्याची चर्चा सुरु आहे.

कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळली शेकडो आधारकार्ड

आधारकार्ड ही भारतीय असल्याची ओळख असल्याने या कार्डचे मोठे महत्व आहे. याच आधारकार्ड नसल्यामुळे गरिबांना रेशनचे धान्य मिळत नाही. आधारकार्डच्या सहाय्याने बँक खात्यासह अनेक ठिकाणी प्राथमिकतेने त्याचा वापर करण्यात येत आहे. दरम्यान मुंब्रा परिसरातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शेकडो आधारकार्ड बेवारस आढळल्याने एकच खळबळ उडाली. आधारकार्ड बेवारस कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक संजय दवले यांनी पाहणी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. मुंब्रा हसरा शाळेच्या मागे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आधारकार्ड ओरिजनल असल्याचे समजले. तत्परतेने घटनास्थळी जाऊन पोलीस अधिकारी यांनी जागेवरील ५७ आधारकार्ड सोमवारी सीआरपीसी १०२ नुसार सील करून घेतली. त्याचा आवाहाल तहसीलदार यांना पाठविण्यात आला आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.

Intro:मुंब्रा देवारीपाडा येथे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळले शेकडो आधार कार्डBody:

मुंब्रा कौसा परिसरातील देवारीपाडा येथील हसरा शाळेच्या पाठीमागे टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शेकडो आधारकार्ड बेवारस पडल्याचे आढळल्याने एकच खळबळ उडाली. शेकडो आधार कार्ड बेवारस असल्याने हे बनावट बनविल्याची असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. किंवा पोस्टमनने लोकांची आलेली आधारकार्ड वितरित न केल्याने ती नष्ट करण्याच्या उद्देशाने कचऱ्यात फेकल्याची चर्चा सुरु आहे. आधारकार्ड हि भारतीय असल्याची ओळख असल्याने या कार्डचे मोठे महत्व आहे. याच आधारकार्डमुळे गरिबांना रेशन मिळत नाही. तर आधारकार्डच्या सहाय्याने बँक खात्यासह अनेक ठिकाणी प्राथमिकतेने त्याचा वापर करण्यात येत आहे. दरम्यान मुंब्रा परिसरातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शेकडो आधारकार्ड बेवारस आढळल्याने एकच खळबळ उडाली. आधारकार्ड बेवारस कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोमवारी देवारीपाडा हसरा शाळेच्या मागे कचऱ्यांच्या ढिगाऱ्यात आधारकार्ड आढळले. घटनास्थळी पोलीस उप निरीक्षक संजय दवले यांनी पाहणी करून वरिष्ठ अधिकारी याना माहिती दिली.मुंब्रा हसरा शाळेच्या मागे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आधारकार्ड ओरिजनल असल्याचे समजले. तत्परतेने घटनास्थळी जाऊन पोलीस अधिकारी यांनी जागेवरील ५७ आधारकार्ड सोमवारी सीआरपीसी १०२ नुसार सील करून घेतली. त्याचा आवाहाल तहसीलदार याना पाठविण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.
Byte मधुकर कड(वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंब्रा)
Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.