ठाणे - महाशिवरात्रीत शिवभक्त शिवलिंगावर दूध वाहतात. हे दूध वाया जाऊ नये म्हणून डोंबिवली शहरात पॉज प्लॅन्ट अँड एनिमल वेल्फेअर सोसायटी या संस्थेच्यावतीने डोंबिवलीत पूर्व व पश्चिम येथील शिव मंदिरातून शिव भक्तांकडून 100 लिटर दूध जमा करण्यत आले. शिव भक्तांकडून जमा करण्यत आलेले हे दूध फिल्टर करून वृद्धाश्रम, अनाथालयातील मुले, तसेच रस्त्यावरील भटके कुत्रे, मांजरे यांना दिले जाते. संस्थेचे अध्यक्ष निलेश भणगे आणि त्यांचे सहकारी गेल्या 5 हा उपक्रम राबवत आहेत.
हेही वाचा - उल्हासनगरातील 6 मजली इमारतीची भीषण आग सहा तासानंतर आटोक्यात
या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत केले जात असल्याचे संस्थेचे अध्यक्ष भणगे यांनी सांगितले. शुक्रवारी संस्थेच्या उपक्रम प्रमुख साधना सभरवाल यांच्यासह युनिशिया, ग्लेन आणि आयुष यांनी विविध मंदिरातुन सुमारे 100 लिटर दुध जमा केले. हे दूध फिल्टर करून रस्त्यावर फिरुन भटक्या जनावरांना पाजले जाते. यंदा या उपक्रमाला शिवभक्तांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे साधना सभरवाल यांनी सांगितले.