ETV Bharat / state

सीसीटीव्ही : टोळक्याची तलवारी घेऊन घरात लुटपाट - ulhasnagar latest news

शहरात १५ ते २० गावगुंडाच्या टोळीने तलवारी हातात घेत दहशत निर्माण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

houses of citizen robbed by goons in ulhasnagar
धक्कादायक ! तलवारीच्या जोरावर नागरिकांच्या घरात घुसून लुटपाट
author img

By

Published : Jan 7, 2021, 9:22 PM IST

ठाणे - उल्हासनगर शहरात १५ ते २० गावगुंडाच्या टोळीने तलवारी हातात घेत दहशत निर्माण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या प्रकारामुळे उल्हासनगरमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघाले आहे. रोहित झा, नंनु राय, सुधाकर यादव, लल्ली, संतोष, हरचंद आणि सूरज लोट यांच्या टोळीने ही दहशत माजवली आहे.

नागरिकांच्या प्रतिक्रिया

रोख रक्कम आणि दागिने लुटले -

उल्हासनगर कॅम्प नंबर दोनच्या हनुमान नगर परिसरात रात्री एकच्या सुमारास १५ ते २० गुंड हातात तलवारी, लोखंडी रॉड घेऊन रहिवाशांच्या घरात घुसले. त्यांनी मिळेल त्या घरात घुसून तोडफोड करीत मोठ्या प्रमाणात लूटमार केली. या गुंडांनी दहापेक्षा अधिक घरे तर अनेक गाड्यांची तोडफोड केली. उल्हासनगरमधील एका सराईत गुंडाची ही टोळी असल्याची माहिती समोर आली आहे. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी घटनास्थळी येऊन केली फक्त विचारपूस -

दरम्यान स्थानिकांनी पोलिसांना याची माहिती दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी येऊन फक्त विचारपूस करून निघून गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. याप्रकरणी उल्हासनगर एक नंबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या गुंडांना पकडण्यासाठी पथकं तयार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

हेही वाचा - विशेष : आजही राज्यातील 80 हजारांहून गृहनिर्माण सोसायट्या 'कन्व्हेयन्स'पासून दूर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.